१४ जानेवारी भूगोल दिन विशेष राष्ट्रीय भूगोल दिनाला विशेष महत्व-प्रा.धनंजय कदम



आज मकर संक्रांती बरोबर आज भूगोल दिन ही साजरा करण्यात येतो. १४ जानेवारी हा दिवस जागतिक भूगोल दिन म्हणून राज्यातील शालेय, महाविद्यालयीन पातळीवर मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात.

.भूगोल महर्षी डॉ. सी. डी.देशपांडे यांचा१४ जानेवारी जन्म दिवस राष्ट्रीय भूगोल दिवस म्हणून साजरा केला जातो

भूगोल या शब्दाचा सरळ अर्थ 'पृथ्वीचा गोल असा होतो.भूगोल हा शब्द इंग्रजीतील Geography या शब्दासाठी वापरला जातो. लॅटिन भाषेतून आलेल्या या शब्दाचा अर्थ भू वर्णन शास्त्र असे केला जातो. पृथ्वीवरील भौतिक व मानवी पर्यावरणातील रचना क्रिया आंतरक्रिया यांचा अभ्यास म्हणजे भूगोल असे स्थूल मानाने सांगितले जाते.

भूगोल म्हणजे मानव व पर्यावरण यांचा संबंध शोधणारे शास्त्र अशी देखील व्याख्या केली जाते.

भूगोल दिन’ एका अर्थी ऋतुबदल होण्याचा हा दिवस सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणून याच दिवशी ‘भूगोल दिन’ साजरा करण्याचे ठरले.

भूगोलाचा सहसंबंध त्यानुसार भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे उपक्रम निवडले जातात. व्याख्याने, ध्वनिफिती दाखवून भौगोलिक घटकांचे महत्त्व सांगणे, भौगोलिक सहली, नकाशे भौगोलिक साहित्याची प्रदर्शने, विषयांशी असलेला भूगोलाचा सहसंबंध असे अनेक उपक्रम घेतले जातात. वर्षांतून एकदा तरी या विषयावर लक्ष केंद्रित व्हावे, या उद्देशाने अनेक उपक्रम घेतले जातात. भोरच्या विद्याप्रतिष्ठान शाळेत ही असेच उपक्रम राबविण्यात आले आहे.

भूगोलाचा इतिहास –

भूगोलाचे अध्ययन प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये केलेले आढळते. ग्रीकांनी शास्त्र व तत्त्वज्ञान म्हणून

भूगोलाचे अध्ययन केले आणि पृथ्वीचा आकार व तिची रचना कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. प्राचीन ग्रीक शास्त्रज्ञ अ‍ॅरिस्टॉटलने पृथ्वी गोल आहे असे सांगितले व इरॅथोसिसने पृथ्वीच्या परिघाचे मापन केले. रोमनांनी पृथ्वी हे विश्वाचे केंद्र आहे असे मानून नकाशेसुद्धा तयार केले. विश्वाला ३६० अंशांमध्ये विभागून अक्षांक्ष व रेखांशाची कल्पना मांडली. मध्ययुगाच्या काळात रोमन संस्कृती लयाला गेली आणि भूगोलाची ज्ञानसंपदा युरोपकडून मुस्लिम जगाकडे आली. इद्रिसी, इब्न बतूत, इब्न खलादुन यासारख्या वैज्ञानिकांनी त्यांच्या हाजींना ही माहिती भाषांतरित करून पुरविली. आणि नंतरच्या कालावधीत रोमन व ग्रीकांची सर्व साहित्यसंपदा अनेक शास्त्रज्ञांनी अनुवादित केली व बगदाद येथे विश्वविद्यालयाची स्थापना केली

सोळाव्या व सतराव्या शतकांमध्ये क्रिस्तोफर कोलंबस, मार्को पोलो व जेम्स कूक यांनी पुष्कळ नवीन प्रदेशांचा शोध लावला. त्यांच्या अनुभवांवरून काही नकाशे नव्याने तयार करण्यात आले. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांमध्ये भूगोलाला वेगळ्या अध्ययनशास्त्राचा दर्जा प्राप्त होऊन युरोपमधील प्रमुख विश्वविद्यालयांमध्ये भूगोलाचे अध्ययन होऊ लागले. यात प्रामुख्याने पॅरिस व बर्लिन विश्वविद्यालयांचा समावेश होता. अठराव्या शतकामध्ये भूगोलाच्या अभ्यासाकरिता अनेक भौगोलिक संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यात १८२१ साली स्थापन झालेली Societe de Geographie, १८३० साली स्थापन झालेली रॉयल जियोग्राफिकल सोसायटी, १८४५ साली स्थापन झालेली रशियन जियोग्राफिकल सोसायटी, १८८८ साली स्थापन झालेली नॅशनल जियोग्राफिक सोसायटी यांचा प्रामुख्याने समावेश होता. भूगोलाचा तत्त्वज्ञानाच्या शाखेपेक्षा विज्ञानाच्या शाखेशी संबध जोडण्यासाठी रिम्युल कान्ट, अलेक्झांडर वोन हुम्बोल्ट, कार्ल रिटर आणि पॉल विडाल डी ला ब्लैंचे यांनी योगदान दिले.

गेल्या दोन शतकांमध्ये संगणकाच्या नवशोधामुळे भूगोलाच्या अध्ययनात geomatics आणि इतर परिष्कृत पद्धतींचा वापर प्रभावीपणे होत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये विसाव्या शतकापासून पर्यावरणीय सिद्धान्त, प्रादेशिक भूगोल, परिणामीय क्रांती (आंकड्याच्या साहाय्याने परिणाम-निश्चिती), समालोचनात्मक भूगोल अशा विविध मार्गांनी भूगोलाचे अध्ययन होत आहे. भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, जनसंख्या अध्ययनशास्त्र यांचा भूगोलाशी घनिष्ट असा आंतरसंबध आहे. आणि यामुळे भू-शास्त्राचे सर्वांगाने अध्ययन होण्यास मदत होत आहे

भूगोल दिनाचे महत्व- तारखे नुसार उत्तरायानाची सुर वात २२ डिसेंबर रोजी होत असली तरी भारतीय तिथी नुसार ती पौष महिन्यात म्हणजे जानेवारीत होते तसेच १४ जानेवारी येणाऱ्या मकरसंक्रांतीला सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचा काळ सर्व साधारणपणे एक महिना असतो असा बारा महिने बारा राशीतून प्रवास सुरू असतो.१४ जानेवारी रोजी होणाऱ्या मकरसंक्रमनात सूर्याच्या ऊर्जेचे संक्रमण होते. या दिवशी विविध उपक्रमात भौगोलिक प्रदर्शनामध्ये भौगोलिक प्रतिकृती,नकाशे तक्ते,खडक माती खनिजांचे नमुने ठेवले जातात. भौगोलिक सहलींचे आयोजन केले जाते. भौगोलिक हस्तलिखित यांचे प्रकाशन केले जाते भूगोल तज्ज्ञांचे मार्गदर्शन पर  गेस्ट लेक्चर आयोजित केली जातात. शैक्षणिक वेगवेगळ्या स्तरारावर विशेषतः महाविद्यालयीन पातळीवर भूगोल दिनाचे महत्त्व पटवून दिले जाते.

या भूगोल दिनाच्या निमित्ताने भूगोल विषयाचे अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या  देशातील बंधू भगिनींना आणि आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget