(६ जानेवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान).
सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार दै.संचारचे पत्रकार प्रशांत जोशी यांना जाहीर. सामाजिक,शैक्षणिक,क्रिडा व अशा अनेक क्षेत्रात आपली पत्रकारितेमधून उत्कृष्टरित्या कामगिरी बजावत आहेत. याची दखल घेऊन यंदाचा आदर्श पत्रकार पुरस्कार दै.संचारचे प्रशांत जोशी व पत्रकार भारतकुमार मोरे यांना जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण दि.6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता विजापूर रस्त्यावरील पत्रकार भवन पत्रमहर्षी रंगाअण्णा सभागृहात करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंह राजपूत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येणार असून कोरोना महामारीच्या काळात योगदान दिलेल्या डॉक्टरांचाही कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.तरी या पत्रकार दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक मठपती, कार्याध्यक्ष लतीफ नल्लामंदू , सचिव प्रा. पी. पी. कुलकर्णी यांनी यावेळी केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.