शेतमजुरांचा हक्कांसाठीच्या लढ्यात महिलांनी मोठ्या संख्येने सामील व्हावी:- विष्णु कारमपुरी (महाराज)




सोलापूर // प्रतिनिधी  


शेतमजुर हा गेल्या अनेक वर्षापासून हक्क व न्यायापासून वंचित राहिला असून शेतमजुरी करणान्यात महिलांची संख्या मोठी असून महिलांनी या लढ्यात मोठ्या संख्येने सामील व्हावे . असे आव्हान महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी बैठकीस उपस्थित शेतमजुर महिलांना केले . 

         

 उत्तर सोलापूर हगलुर येथे शेतमजुर महिलांची बैठक विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या उपस्थित संपन्न झाला . यावेळी बोलतांना विष्णु कारमपुरी ( महाराज ) पुढे म्हणाले की सरकार शेतमजुर कामगारांकडे दुर्लक्ष करीत असून त्यामुळे समाजात शेतमजुराला जगणे मुश्किल झाले आहे . त्याचबरोबर आर्थिक , सामाजिक , शैक्षणिक , आरोगय व कौटुंबिक यासर्व बाबीत मागासलेला राहिले आहे . म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात येणाऱ्या तीन आंदोलनात महिलांनी मोठ्यासंख्येने सामील होणे गरजेचे व आवश्यक आहे असेही म्हणाले . आणि सामील होण्याचे आव्हान केले . 

            

ता. उ. सोलापूर हगलुर येथे झालेल्या शेतमजुर बैठकीस मनकरणा गुंड , मंदाबाई कांबळे , जयश्री चौधरी , शकुंतला माने , अश्विनी शेटे , दत्तात्रय शिंदे , अॅड . मुनिनाथ कारमपुरी , बिपीन साबळे , शिवानंद येरटे यांच्यासह शेतमजुर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget