बांधकाम कामगार बोगस नोंदणी घोटाळ्याचे बैठक पुन्हा लांबणीवर

 



एक आठवडा वाचलोरे बाबा अधिकारी व कर्मचार :- विष्णु कारमपुरी (महाराज)


सोलापूर // प्रतिनिधी 

शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया मार्फत बांधकाम कामगारांचे बोगस नोंदणी करुन कोटयावधी रुपयांचे शासनाची फसवणूक केली आहे . म्हणून यांची चौकशीकरुन संबंधितावर कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन मा. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यावरुन मा. जिल्हाधिकारी श्री. शंभरकर साहेब त्यांनी आज म्हणजे १५/०१/२०२१ शुक्रवार रोजी त्यांच्या दालनात बैठक बोलविली परंतु काही अपरिआर्य कारणामुळे सदर बैठक २२/०१/२०२१ रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले त्यामुळे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, व दलाल,एक आठवडा वाचलोरे बाबा असे म्हणत निघून गेले. अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.            

सोलापूर जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया मार्फत बांधकाम कामगारांची योजना जाहिर झाल्यापासून जी नोंदणी झाली. ती बोगस कामगारांची नोंदणी आहे. सुरुवातीच्या कालावधीत कमी प्रमाणात बोगस नोंदणी झाली त्यानंतर सन २०१९ ते २०२० अखेरपर्यंत फक्त बोगस कामगारांचीच नोंदणी झाली. असल्याची तक्रार महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा. जिल्हाधिकाऱ्यांकडे करुन यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यावरुन ६/१/२०२१ ला बैठक स्थगीती झाले. नंतर १५/१/२०२१ रोजी ची ही बैठक शासकीय अपर्याहार कारणास्तव रद्द झाल्याचे कळवून पुढील बैठक २२/१/२०२१ रोजी ठेवल्याचे सांगीतले .           

मा. जिल्हाधिकारी यांच्या दालनात होणाऱ्या आजच्या बैठकीबाबत संपूर्ण जिल्ह्यातील बांधकाम कामगार व संघटना, दलाल, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व प्रसिध्दी माध्यमांचे लक्ष लागले होते. परंतु बैठक स्थगीत झाल्याने दलाल, अधिकारी व कर्मचारी, वाचलोरे बाबा अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालय व सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय या परिसरात ऐकू येत होती.            

बैठक पुढे ढकलल्याने कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी नाराजी व्यक्त केले. पण बांधकाम कामगार बोगस नोंदणी केलेल्यावर कडक कारवाई व्हावी यावर ते ठाम आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget