वृत्तसंस्था // प्रतिनिधी
महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या पुणे प्रादेशिक बैठक सोलापूर मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली याबैठकीत एसटी महामंडळाचे MRTU & PULP ACT 1971 या कायद्यातून वगळून शासनात विलिनीकरण करावे व काॅंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त जाहीरनाम्यात दिलेल्या शपथनाम्याची पुर्तता करावी
तसेच केंद्र सरकारने केलेल्या कामगार व शेतकरी विरोधी कायदे महाराष्ट्रात लागू करू नयेत यासाठी महाराष्ट्र इंटकच्या वतीने मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी बैठकीत सांगितले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनापर भाषणात मार्गदर्शन करताना आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की एस.टी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह इतर प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले वेळ प्रसंगी महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) संघटनेच्या माध्यमातून प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे सांगितले.
संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे मार्गदर्शन करताना म्हणाले की मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या नाकर्तेपणामुळे आज एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, कधी विलीनीकरण, कधी वेतन आयोग कधी करार अशा दरवेळी काहीतरी नवीन मागण्यां करुन कामगारांची दिशाभूल केली आहे, रजा ड्युटी, अलोकेशन या माध्यमातून कामगारांना वेठीस धरले आहे तसेच एस.टी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. लवकरच या विरोधात तिव्र आवाज उठवला जाईल व वेतनासाठीसह इतर प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आंदोलन उभारण्यात येईल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अंबादास करगुळे, गौरव खरात, तिरुपती परकीपंडला आदी शहर काँग्रेस पदाधिकारी तसेच संघटनेचे उपाध्यक्ष बंडोपंत वाडकर, आप्पासाहेब साळोखे, मोहन साळुंके, रमेश शिंदे, धनंजय जाधव, विजय चौगुले, आर एन तांबोळी, असिफ मुल्ला, मिना जाधव, शशिकांत सावंत, यासह
विभागीय पदाधिकारी, आगार पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीचे नियोजन सोलापूर मनपा नगरसेवक व विभागीय अध्यक्ष विनोद भोसले व संघटनेचे कार्याध्यक्ष व विभागीय सचिव श्रीकांत सड्डु यांनी केले यासाठी अशोक बनसोडे, सदाशिव अंबुरे, रवींद्र गायकवाड, शिवानंद गौडगावं, प्रकाश कोठे, बेंजरपे, हर्षद आठल्ये, सुर्यकांत जामगावकर, रविंद्र इंगळे, संभाजी पवार, आबा मोरे, कुंडलिक सरवदे, जाधवर, विलास निंबाळकर, गणेश गवळी, अमोल बड्डे, उमेश बनसोडे, रिहाना मुजावर, पांडु सुतार, नाना नलावडे, सुतार, कांबळे, लंगोटे, नवनाथ चव्हाण, राजकुमार गायकवाड,
यासह अनेक आगारातील पदाधिकारी बंधु-भगिनीं बहुसंख्येने उपस्थित होते.
शाहु महाराज सलगर, परकीपंडला, यासह सोलापूर स्थानिक काॅंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
अक्कलकोट, सांगोला, अकलूज, करमाळा आगारातील २०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी मान्यताप्राप्त संघटना व कामगार सेनेच्या जुलमी निर्णयांना कंटाळून इंटक संघटनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इंटक संघटनेत अधिकृत प्रवेश केला.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.