उत्तम आरोग्य हि काळाची गरज :- आ. प्रणिती शिंदे

 


नगरसेवक विनोद भोसले यांच्या भांडवली निधीतुन खंदक बाग येथे ओपन जिम चे उद्दघाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते


सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर शहरातील व्यायाम, योगासन करणाऱ्या नागरिक, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी नगरसेवक विनोद भोसले यांच्या संकल्पनेतुन आणि त्यांच्या भांडवली निधीतुन किल्ल्ला बगीचा खंदक बाग येथे ओपन जिम तयार करण्यात आले त्यांचे उद्दघाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोमपा गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, स्मार्ट सिटी प्रमुख त्र्यम्बक ढेंगळे पाटील, उपायुक्त धनराज पांडे, युवक कांग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, क्रीड़ा अधिकारी नजीर शेख, अहादभाई शेख, बसवराज सलगर, सूरेश फलमारी, अविनाश कुलकर्णी, तिरुपती परकीपंडला, हरळी प्लाट योगासन मंडळ प्रमुख मेणसे साहेब, किरणभाई सुरतवाला, मोहन तुम्मा,गणपत मिरजकर, चंद्रकांत रेम्बरसु, शाहु सलगर, महादेव तोग्गी, योगेश मार्गम, विवेक कंन्ना, संतोष अट्टेलुर, संजय गायकवाड़ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.


यावेळी आपले विचार व्यक्त करताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की किल्ला बगीचा पुरात्वव खात्याच्या अखत्यारीत येत असल्यामुळे येथे बांधकाम, खोदकाम काहीही करता येत नाही किल्ला बगीचा हा सोलापुरचा ऐतिहासिक ठेवा आहे आणि तो जपणे आपले कर्तव्य आहे म्हणुन नगरसेवक विनोद भोसले यांनी अतिशय चांगली संकल्पना मांडून ओपन जिम आपल्या निधीतुन तयार केली. व्यायामामुळे आपले आरोग्य चांगले राहते, आयुष्याची वर्षे वाढतात. कुणी म्हटले आहे की चलने से उमर बढ़ती है हे सत्य आहे. 


यावेळी पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाले की सोलापुर अलीकडे मेडिकल हब म्हणून ओळखला जात आहे. शहराच्या आजुबाजुला सर्व धर्माचे तीर्थक्षेत्रे आहेत त्यात प्रामुख्याने तुळजापुर, पंढरपुर, अक्कलकोट, गाणगापुर, आहेत त्यामुळे भाविकांची सतत वर्दळ आहे त्याचीही आपण मार्केटिंग करणे महत्वाचे आहे. सोलापूर शहरात खुल्या जागा भरपूर आहेत नागरिकांना मोकळे फिरता येते, प्रदूषण कमी आहे, राहण्यासाठी अतिशय योग्य शहर म्हणुन सोलापूर आहे. पुण्या मुंबई सारखे गर्दी, प्रदूषण इथे नाही, लॉकडाउनमुळे नागरिकांना जाणविले आहे की सोलापूर सारखे शहरे राहण्यासाठी जास्त बरे आहेत, आरोग्य किती महत्वाचे आहे हे कोरोनाने दाखवून दिले आणि सर्वाना जमिनीवर आणले. सोलापुरातील शहर मैदाने, बाग विकसित करण्याचे काम आम्ही करतोय, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ही विकसित करण्याचे प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि सर्व नागरिक, युवकांना विनंती केली की आपण सोलापुरात उद्योग करा, नोकरी करा, स्वताच्या पायावर उभे रहा त्यासाठी सहकार्य करण्याची आमची तयारी आहे आज अनेक युवक शहरात नवनवीन उदयोग करत आहेत. इथेच उद्योग केल्यास आपल्या कुटुंबाबरोबर राहु शकतो, चांगल्या व मोकळया वातावरणात राहु शकतो त्यामुळे आपले आरोग्य ही चांगले राहिल. सोलापुरबाबत सकारात्मक बोलू या शहरातील चांगल्या गोष्ठीचे चर्चा करा, सोलापुरचे मार्केटिंग करा, जेणेकरून शहरात उद्योग व्यवसाय वाढतील. तसेच नागरिकांनी आम्हाला सूचना करावी जेणेकरून अधिक चांगले काम करता येईल


यावेळी विजय भुइटे, श्रीकांत गायकवाड़, रोहित भोसले, बसु कोळी, चंद्रकांत पात्रे, सौरभ सालुंखे, गदवालकर, सुभाष वाघमारे, मनोहर माचर्ला, नागेश म्याकल, महेश गायकवाड़, पिंटू माने, गणेश कोळी, महादेव गायकवाड़, पांडुरंग पवार, व हरळी प्लाट अनंदयात्री योगासन मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget