लसीकरणाबाबत केंद्राची कडक नियमावली एकदा वाचाच!



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची उद्या (16 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे. यावेळी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 3006 ठिकाणांहून अनेक जण डिजिटल माध्यमातून सहभागी होणार आहेत, तसंच प्रत्येक केंद्रावर 100 लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे.


 केंद्राचे राज्य-केंद्रशासित प्रदेशांना निर्देश-

 ही लस केवळ 18 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना देण्यात येईल.

 एखाद्या व्यक्तीस इतर कोणत्याही आजारावर लस द्यायची असल्यास कोविड लस आणि दुसऱ्या लसीत 14 दिवसांचं अंतर असणं गरजेचं आहे.

 प्रथम डोससाठी जी लस वापरण्यात येईल दुसरा डोसही त्याच लसीचा दिला जाईल. लशींची अदलाबदल करता येणार नाही.

 गर्भवती किंवा गर्भवती असण्याची शक्यता असणाऱ्या महिलांना किंवा आपल्या अपत्याला स्तनपान देणाऱ्या महिलांना लस देता येणार नाही.

 जर कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत असतील तर त्या व्यक्तीचं लसीकरण ती व्यक्ती बरी झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यांनी केलं जावं.

 कोरोना रुग्ण ज्यांना 'मोनोक्लोनल अँटीबॉडीज' किंवा 'प्लाझ्मा' देण्यात आला असेल, त्यांचंही लसीकरण 4 ते 8 आठवड्यानंतर केलं जावं.

 रुग्णालयात दाखल असलेला किंवा कोणत्याही आजाराशी झगडत असलेला व्यक्तीचं लसीकरण 4 ते 8 आठवड्यानंतर केलं जावं

 ज्या व्यक्ती यापूर्वी कोरोना संक्रमित आढळलेल्या आहेत किंवा ज्यांचा गंभीर आजाराचा (हृदय, न्यूरोलॉजिकल, फुफ्फुस किंवा चयापचय, एचआयव्ही इत्यादी) इतिहास आहे त्यांना लस दिली जाऊ शकते.

 कोरोनावरील लस मोहिमेच्या वितरणासाठी उद्या (16 जानेवारी) 'को विन' (कोव्हिड वॅक्सिन इंटिलिजन्स नेटवर्क) ॲपचं लोकार्पणही मोदी उद्याच्या कार्यक्रमात करणार आहेत. उद्या (16 जानेवारी) सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी जाहीर करण्यात आलं आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget