सोलापूर // प्रतिनिधी
केंद्र शासनाने तंबाकुजन्य पदार्थावर लागु केलेल्या धुम्रपान कायद्यात जाचक व विडी उद्योग पूर्णपणे बंद पडावे, अशा अटी घातले आहेत. त्यामुळे विडी उद्योग पूर्णपणे बंद पडणारच. जर विडी उद्योग बंद पडला तर सोलापूरातील ६० ते ७० हजार कामगार, महाराष्ट्रातील ५ ते ६ लाख कामगार आणि भारत देशातील २ कोटी कामगार बेकार होणार आहेत. म्हणून आता विडी उद्योग वाचवून कामगारांना जगविण्यासाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेना रस्त्यावर उतरुन हार - पारची लढाई करणार असा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी केंद्र शासनाला दिला आहे. ते महाराष्ट्र कामगार सेनेच्या पंचवार्षिक पदाधिकारी शिबीर व कामगार मेळाव्यात बोलतांना सदर इशारा केंद्र शासनाला दिला.
शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचा पंचवार्षिक पदाधिकारी शिबीर व कामगार मेळावा दक्षिण सोलापूर कुंभारी येथे माँ साहेब विडी घरकुल वसाहतीतील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे अध्यक्षतेस्थानी विष्णु कारमपुरी (महाराज) हे होते तर कामगार कल्याण अधिकारी सी.बी. जाधव, यंत्रमाग धारक संघ अध्यक्ष :- पेंटप्पा गड्डम, कामगार सेना उपाध्यक्ष :- दिनकर पतंगे, कामगार सेना अध्यक्ष :- दशरथ नंदाल, विडी कामगार नेत्या :- पद्याताई म्हंता, बिडी व यंत्रामाग कामगार सेना अध्यक्ष :- श्रीनिवास चिलवेरी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत प्रा. श्रीशैल वाघमोडे यांनी केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बंदनीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय मौनाताई ठाकरे यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करुन पुजन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्तावना श्रीनिवास चिलवेरी यांनी केले प्रास्ताविकानंतर कामगार कल्याण अधिकारी श्री. सी.बी. जाधव यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजनांची माहिती सविस्तरपणे दिली व पवार साहेब यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजनांची रुपरेषा सांगितले. यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गडम यांनी यंत्रमाग उद्योजक व कामगारांचे नाते विषयांवर उत्तमरित्या मार्गदर्शन केले, महाराष्ट्र कामगार सेनेचे उपाध्यक्ष व प्रवक्ता दिनकर पतंगे (सांगली) यांनी या मेळाव्यात शेतमुजर व असंघटीत कामगरांच्या समस्या विषयी चर्चा करतांना त्यांनाही शासनाकडून न्याय मिळणे गरजेचे आहे असे सांगुन कामगार सेनेच्या पाठीशी खंभीरपणे उभे रहा असे आवाहन केले. तर विडी कामगार नेत्या पद्माताई म्हंता यांनी विडी कामगारांचा मालकांकडून व सरकारकडून छळ होतांना दिसून येते यासाठी महिला विडी कामगारांनी रस्त्यावर उत्तरुन कामगार सेनेच्या लढ्यात सामील व्हावे असे आवाहन केले.
मेळाव्याचे अध्यक्षीय भाषणांत विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी महाराष्ट्रातील विडी, यंत्रमाग, शेतमजुर, असंघटीत क्षेत्रातील सर्व कामगार, घरेलु कामगार, बांधकाम कामगार, हमाल, हॉटेल, बिगारी, वृत्तपत्र विक्रेते, सफाई, रिक्षावाला, टॅक्सीवाला, छोट्या - छोट्या आस्थापणेतील कर्मचारी व इतर शेकडो असंघटीत क्षेत्रातील कामगारांकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आता हार - पारचीच लढाई करावी लागेल या हार - पारच्या लढाईत सर्व कामगार बंधु - भगिनींनी मोठ्या संख्येने सामील होऊन आपली एकजुट सरकारला दाखवून आपल्या मागण्या मान्य करुन घेऊ या असेही आव्हान कारमपुरी (महाराज) यांनी केले. आणि पदाधिकारी शिबीर व कामगार मेळाव्यास सामील झालेल्या सर्व महिला कामगारांनी आपापल्या परीने जनजागृती करा असे आवाहन केले. शेवटी महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष दशरथ नंदाल यांनी सर्व मान्यवरांचे आणि कामगारांचे मेळावा यशस्वी केल्याचे आभार माणून मेळावा संपल्याचे जाहीर केले.
तत्पुर्वी १) धुम्रपान कायद्याविरोधी ठराव एकमताने पास करण्यात आले. २) महाराष्ट्र कामगार सेनेचे पंचवार्षिक पदाधिकारी सन २०२० ते २०२४ या पाच वर्षाकरिता मागील पदाधिकारी कायम ठेवण्यात आल्याचे ठराव समंत करण्यात आले.
महाराष्ट्र कामगार सेनेच्या पंचवार्षिक शिबीर व कामगार मेळावा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी अॅड. मुनिनाथ कारमपुरी, विठ्ठल कुऱ्हाडकर, प्रशांत जक्का, श्रीनिवास बोगा, पप्पु शेख, गुरुनाथ कोळी, गणेश म्हंता, रमेश चिलवेरी, नागार्जुन कुसुरकर, श्रीनिवास यनगंटी , अनिता बटगिरी , अर्चना चिलका , रमाबाई पंदीला , कृष्णाहरी कुणी , नरेश अन्नलदास आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.