फॅबटेक पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरिय स्केटिंग स्पर्धेत उत्तुंग यश




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल सांगोला येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरिय स्केटिंग स्पर्धेत घवघवीत यश मिळविले. दि. १० जानेवारी २०२१ रोजी पंढरपूर येथे आर के स्पोर्ट्स क्लब आयोजित जिल्हा स्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये इयत्ता ३ री तील आरुष महेश लवटे  व इयत्ता ७ वी  तील रूद्रेश संदीप स्वामी या दोन्हीही विदयार्थ्यांनी आपापल्या गटात व्दितीय क्रमांक पटकाविला. व गोवा येथे होणाऱ्या नॅशनल स्केटिंग स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.


     विद्यार्थांच्या या यशाचे फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर संस्थेचे कार्यकारी संचालक दिनेश रुपनरसंचालिका सौ. सारिका रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय आदाटेशाळेच्या प्राचार्या. श्रीमती शिल्पा कोळेकर सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर  कर्मचारी या सर्वानी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी यशस्वी विद्यर्थ्यांना शाळेतील क्रीडा शिक्षक श्री. पंचाक्षरी स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget