सहाय्यक कामगार आयुक्तांच्या गैर कारभाराची चौकशी बाबत जिल्हाधिकारी चाल ढकल करीत आहेत. :- विष्णु कारमपुरी (महाराज)




सोलापूर // प्रतिनिधी 

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी संगनमताने केलेल्या बोगस बांधकाम कामगार नोंदणी प्रकरण चौकशी करण्याकामी मा . जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर हे चाल ढकल करीत आहेत . म्हणून आता शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे . अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे . 

           सोलापूरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत बोगस बांधकाम कामगार नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे ही नोंदणी सहाय्यक कामगार आयुक्त स्वतः व त्यांचे कर्मचारी संगनमताने बाहेरील दलालांना धरुन ही बोगस नोंदणी केलेली आहे . याबाबत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सदर प्रकरणाची चौकशी करुन सहाय्यक कामगार आयुक्त त्यांचे कर्मचारी व दलाल यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारीकडे निवेदनाद्वारे करण्यात आले . याबाबत मा . जिल्हाधिकारी साहेब यांनी सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांचे कर्मचारी आणि कामगार सेना व इतर तक्रारदार संघटना यांची बैठक बोलविली २ ते ३ बैठका झाल्या परंतु कुठलेही ठोस निर्णय जिल्हाधिकारी साहेब घेत नाहीत याउलट सहाय्यक कामगार आयुक्त श्री . निलेश वलगुंडे किंवा त्यांचे प्रतिनिधी बैठकीलाही उपस्थित राहत नाहीत मात्र जिल्हाधिकारी फक्त तारीखपे तारीख देतात . म्हणजेच बोगस कामगार नोंदणीत कोट्यावधी रुपयाचा शासनाचे पैशाचे भ्रष्टाचार इ गाला आहे . तरीही मा . जिल्हाधिकारी या विषयी गंभीरता दाखवत नाहीत म्हणून मा . जिल्हाधिकारी यांच्या या प्रकरणाबाबत करीत असलेले काम हे सहाय्यक कामगार आयुक्त , कर्मचारी , यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी हे करीत असल्याचे दिसून येते म्हणजेच बोगस बांधकाम कामगार नोंदणीबाबत मा . जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे चाल ढकल करीत आहेत . असे कारमपुरी ( महाराज ) यांनी पत्रकात नमूद केले आहे . आणि याबाबत लवकरच तीन आदोलन करण्यात येणार आहे अशा इशारा दिला .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget