औंढी च्या सरपंच पदी महाडिक व डोंगरे गटाच्या जयश्री अंबुरे यांची तर उपसरपंचपदी प्रकाश बचुटे यांची निवड.





सोलापूर // प्रतिनिधी

मोहोळ तालुक्यातील औंढी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सौ जयश्री अंबुरे तर उपसरपंच पदी प्रकाश बचुटे यांची बिनविरोध निवड झालेली असून भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री दादासाहेब शिंदे यांच्या गटाकडे सत्ता आल्याने त्यांचा गट औंढी गावचा दुसऱ्यांदा कारभारी झालेला आहे.

           

आज झालेल्या सरपंच उपसरपंच निवडीत महाडिक गटाकडून सौ जयश्री अंबुरे यांनी सरपंच पदासाठी तर श्री प्रकाश बचुटे यांनी उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 

दुसरे कोणतेच अर्ज न आल्यामुळे यांना बिनविरोध निवड झाली असे जाहीर करण्यात आले. दरम्यान या निवडणुकी मुळे औंढी ग्रामपंचायत वर शिंदे पार्टी या गटाचे अनेक वर्षापासून चे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे. या निवडणुकीत डोंगरे गटाच्या पांडुरंग अण्णा बचुटे यांनी मोलाची साथ दिली आहे.


दरम्यान निवडीनंतर नूतन सरपंच उपसरपंच व नुतन ग्रामपंचायत सदस्य  स्वाती धनाजी कांबळे  लक्ष्मी जगदीश कोळी  राणी तानाजी शिंदे  आप्पासो बजरंग पाटील यांचा शाल  श्रीफळ फेटा देऊन गुलालाची मुक्तपणे उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले या निवडीवेळी दादासाहेब शिंदे पांडुरंग अण्णा बचुटे ॲड .आबासाहेब शिंदे शांतीलाल आंबुरे हरिभाऊ शिंदे सोसायटीचे माजी चेअरमन प्रदीप शिंदे चौगुले गुरुजी अनिल भुसे राहुल भुसे विजय भुसे सुहास भुसे औदुंबर शिंदे सुभाष बचुटे अर्जुन शिंदे धनाजी कांबळे तानाजी शिंदे सागर भुसे राजेंद्र भुसे काका भुसे राजेंद्र शिंदे जिवला माने महावीर काशीद शाहू काशीद नाशिक अंबुरे श्रीमंत सोलंकर धनाजी कांबळे जगदीश कोळी गुंड डॉक्टर दादा थोरबोले गुंड गुरुजी कृष्णदेव बचुटे गणेश पडसाळकर आप्पा कांबळे नितीन कांबळे श्रीकांत सोनवणे दिनकर घाडगे सुनील उघडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रविणकुमार सोनटक्के व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व्हि के माने यांनी काम पाहिले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget