राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार तसेच संसदपटू म्हणून म्हणून लोकप्रियता मिळवलेले माजी खासदार श्री. धनंजय उर्फ मुन्ना साहेब यांचे चिरंजीव श्री. पृथ्वीराज महाडिक यांचा विवाह सोहळा पुणे येथील पंचतारांकित हॉटेल वेस्ट इन या ठिकाणी फक्त कुटुंबातील 100 सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. या विवाह सोहळ्यानिमित्त मगरपट्टा येथील लक्ष्मी लॉन्स या ठिकाणी संध्याकाळी ६ ते रात्री १० या कालावधीमध्ये सर्व पक्षाचे मान्यवर, आमदार, खासदार, मंत्री महोदय, तसेच कार्यकर्ते यांच्यासाठी शाही मेजवानीचा सोहळा संपन्न झाला. परंतु सदर रिसेप्शनच्या कार्यक्रमाला एक हजार नागरिक उपस्थित झाले. व कोरोना नियंत्रणासाठी शासकीय आदेशाप्रमाणे घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी माजी खासदार श्री. धनंजय महाडिक व लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर तसेच व्यवस्थापक निरुपम केदार यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. परंतु सोहळ्याच्या ठिकाणी कोरोना नियंत्रणासाठी चे सर्व नियम पाळले जात असल्याचे चित्र होते. प्रवेशद्वारा मध्येच चार सुशिक्षित महिला सॅनिटायझर स्प्रे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांच्या हातावर, अंगावर फवारत होत्या.तसेच लगेच पुढच्या बाजूला येणाऱ्या प्रत्येकाला सॅनिटायझर मास्क देण्यात येत होता. आत प्रवेश केल्यानंतर प्रशस्त लॉन्स सहित पटांगणामध्ये योग्य अंतर ठेवून सोफा सेट तसेच डायनिंग टेबल ठेवण्यात आलेले प्रकर्षाने दिसत. होते शाही मेजवानी चे फूड स्टॉल्स योग्य अंतर ठेवून लावण्यात आलेले स्पष्ट दिसत होते. अन्न वाटप करणारे सर्व कामगार मास्क तसेच हात मोजे घालून काम करत असल्याचे स्पष्ट दिसत होते. संपूर्ण पटांगणाच्या परिसरामध्ये ठिकाणी स्टिरिओज लावलेले होते व संयोजिका श्वेता हुल्ले व त्यांचे सहकारी क्षणाक्षणाला कोरोना पसरू नये याबाबत ची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून योग्य अंतर राखण्यासाठी तसेच प्रत्येकानं तोंडाला मास्क घाल्या विषयी व प्रत्येक टेबलवर बाटल्यांमधून ठेवलेले सनी टायझर वारंवार वापरावे याविषयी ध्वनिक्षेपकावरून क्षणाक्षणाला आवाहन करताना दिसत होते. कार्यक्रम स्थळी व्हीआयपी तसेच व्हीव्हीआयपी मोठ्या प्रमाणावर हजर होते. त्यामुळे प्रचंड पोलीस बंदोबस्त होता.उपस्थित पोलीस प्रशासन हेसुद्धा कोरोना विषयीचे सर्व नियम पाळण्याविषयी सतर्कता दाखवत होते व आपले कर्तव्य बजावत होते. कार्यक्रमाची वेळ ही संध्याकाळी 6 ते 10 अशी ठेवण्यात आली होती व प्रत्येक निमंत्रिताला वेगळी वेळ देण्यात आलेली होती. त्यानुसार निमंत्रित वेगवेगळ्या वेळेला येऊन वधूवरांना व्यासपीठावर योग्य अंतर ठेवून शुभेच्छा देऊन जात होते व शाही मेजवानीचा वेगवेगळ्या वेळेला आस्वाद घेऊन जाताना दिसत होते. केटरिंग मॅनेजमेंटचे स्वयंसेवक आंतर राखणे विषयी वारंवार आवाहन विनंती करताना दिसत होते. कुठेही गर्दी गोंगाट झालेला दिसत नव्हता.
तरीही खा.धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा कसा काय दाखल होऊ शकतो? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. देशावर आलेल्या गुरुनाथ संकटा विरुद्ध लढाई करत असताना भारतीय प्रथा परंपरा व विवाहा सारखे रितीरिवाज कोरोनाचा चा प्रसार होणार नाही याची योग्य काळजी घेऊन पार पाडणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. परंतु अशा प्रकारे राजकीय हेतूने प्रेरित गुन्हे दाखल व्हायला लागले तर लग्न समारंभा सारखे महत्वाचे सोहळ्यांना हद्दपारच करायचे का? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.
-चौकट-
कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वांना लग्नाचे निमंत्रण देऊ शकलो नाही - खा. धनंजय महाडिक
कोरोना प्रसार वाढू नये म्हणून काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक ऊपाययोजना म्हणून कार्यक्रमांच्या माध्यमातून गर्दी होऊ नये यासाठी सरकारने कडक आदेश पारित केलेले असल्यामुळे माझ्या चिरंजीवांच्या लग्नसोहळ्यासाठी मी भीमा कारखान्याच्या सभासद, कामगार, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माझ्या कोल्हापूर मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांना खूप इच्छा असूनही लग्नाचे निमंत्रण देऊ शकलो नाही याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
=====================================
निमंत्रण नाही म्हणून भीमा सभासद- कामगारांनी नाराज होऊ नये- प्रा.संग्राम दादा चव्हाण,समन्वयक भीमा परिवार
श्री.महाडिक हे लोकप्रिय लोकप्रतिनिधी असल्याने तसेच भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असल्याने त्यांचा जनसंपर्क खूप दांडगा आहे. विवाह सोहळ्यासाठी स्वतः शरद पवार ,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे, खासदार संभाजीराजे व इतर मान्यवर उपस्थित होते. स्वतःच्या मुलाच्या लग्नाला त्यांच्या कोल्हापूर मतदारसंघातून तसेच भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना मोठ्या प्रमाणावर निमंत्रण देण्याची महाडिक यांची मनोमन इच्छा असतानासुद्धा केवळ कोरोना नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून अतिशय मर्यादित लोकांना निमंत्रण देण्याची काळजी महाडिक कुटुंबीयांना घ्यावी लागली. मर्यादित आमंत्रणे देण्यामुळे श्री. महाडिक यांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते तसेच नागरिक नाराज होणे सहाजिकच आहे.परंतू कायद्याची व आरोग्याच्या सुरक्षेची काळजी लक्षात घेऊन विवाह सोहळ्याला निमंत्रण नाही म्हणून कुणीही गैरसमज करून घेऊन नाराज होऊ नये असे आवाहन भीमा परिवाराचे समन्वयक प्रा. संग्रामदादा चव्हाण यांनी भीमा कारखान्याच्या सर्व सभासद व कामगारांना व नेते मंडळीना केले.सदर विवाह सोहळ्याचे नऊ विविध टप्पे पाडून सोहळा पार पाडण्याचे तगडा नियोजन महाडिक कुटुंबीयांनी केले होते.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.