सोलापूर // प्रतिनिधी
2019- 20 साली झालेल्या अतिवृष्टीमुळे पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी काळच्या परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यामध्ये भीमा नदीच्या काठी असलेल्या गावांमधील लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसानभरपाई देण्यात आलेली आहे. पण निष्काळजी व ढिम्म प्रशासनाने रक्कम तहसील कार्यालयाच्या खात्यावरती जमा झालेल्या असताना सुद्धा गोरगरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केलेली नाही. ही दुसऱ्या टप्प्यातील मदत लवकरच पंढरपूर तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी यासाठी आज पंढरपूर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूरचे नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्पष्टपणे उल्लेख केला असून अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्वरित मदत निधी त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी विष्णू बागल, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पाटील पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन पाटील विभाग प्रमुख अक्षय महानवर सोशल मीडिया चे आप्पा चोरमले व बहुसंख्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व पंढरपूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.