विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वाढीव लेखा परीक्षण शुल्क कमी करा.सहकार मंत्र्यांना निवेदन




सोलापूर // प्रतिनिधी  

सोलापूरातील महिला विडी कामगार गृहनिर्माण संस्थेला आकारण्यात आलेल्या वाढीव लेखा परिक्षण शुल्क कमी करावी. अशा मागणीचे निवेदन माँ साहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा.ना. श्री . बाळासाहेब पाटील यांना दिली असल्याचे माहिती माँ साहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक चेअरमन विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी दिली आहे . 

            मा . सहकारमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई , यांना माँ साहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी दिलेल निवेदनात आमच्या माँ साहेब विडी - कामगार गृहनिर्माण संस्थेचे लेखापरिक्षण वाढीव शुल्क कमी करावे म्हणून आपणाकडे *दि .२८ / १ / २०२० , दि . ११/२/२०२० , दि . ०२/१२/२०२० व दि . २२/१२/२०२०* रोजी मुंबई येथे समक्ष भेटून निवेदन दिलेली आहे . याबाबत कोणतेही संबंधीत खातयाकडून उचित कार्यवाही इ गालेली नाही . 

           आमची गृहनिर्माण संस्था ही गरीब बेघर महिला विडी कामगारांची आहे . आणि गरीब विडी कामगार महिला असल्याने केंद्र व राज्य शासनाचा अनुदानातुन घरकुल योजना राबविले आहे . म्हणून लेखापरीक्षण शुल्क भरण्यास संस्थेस सदस्य असलेल्या गरीब महिला विडी कामगारांना अशक्य आहे . 

           तरी माननीयांनी आपण राज्याचे सहकारमंत्री या नात्याने माँ साहेब गृहनिर्माण संस्था मर्या कुंभारी या संस्थेचे २०१८ ते २०२० पर्यंत वाढीव लेखापरीक्षण शुल्क रद्द करावे ही नम्र विनंती . असे नमुद करण्यात आले .

             सोलापूरातील शासकीय विश्राम गृहात मा . सहकारमंत्री श्री . बाळासाहेब पाटील यांना विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात श्रीनिवास तोपुल , श्रीनिवास बोगा , शिवानंद येरटे , नागार्जुन कुसूरकर , रेखा आडकी , अर्चना चिलका , संध्याराणी कुऱ्हाडकर , अनिता बटगिरी यांचा सहभाग होता .


Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget