सोलापूर // प्रतिनिधी
धुम्रपान कायद्याचे वारंवार वाढत असलेल्या जाचक अटींमुळे संकटात असलेला विडी उद्योग पुर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे . म्हणून सोलापूरातील कामगरांचे उपजिवीका असलेला विडी उद्योग धुम्रपान कायद्यामुळे बंद पडू नये म्हणून सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री श्री . दत्ता ( मामा ) भरणे यांनी केंद्र शासनाकडे धुम्रपान कायद्यातुन विडी उद्योग वगळण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून प्रयत्न करावे . अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री मा . श्री . दत्ता ( मामा ) भरणे यांना दिल्याचे महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे .
पालकमंत्री श्री . दत्ता ( मामा ) भरणे यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात सोलापूरसह संपूर्ण हिंदुस्थानात विडी उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची संख्या ५ कोटी पेक्षा जास्त आहे , यापैकी सोलापूर जिल्ह्यात ७० ते ८० हजार कामगार असुन विशेष करुन या उद्योगात महिलांचा सहभाग एकूण कामगारांच्या ९ ५ % टक्के आहे . हे सर्व कामगार कुटुंबिय विडी उद्योगातुनच आपले उदनिर्वाह करतात असे असतांना केंद्र शासनाने २००४ साली विडी उद्योगाला लागु केलेला धुम्रपान कायद्यात दिवसेंदिवस अधिक जाचक व विडी उद्योगावर संकट आणण्याचा प्रयत्न होत आहे . म्हणजेच सन २००४ साली १५ % टक्के वैधानिक सुचना विडी बंडलवर छापणे असा कायदा होता . तो १५ % टक्क्यावरून ४० % टक्के , ६५ % टक्के , ८५ % टक्के अशा अंतरा - अंतराने वाढवून १ एप्रिल २०२१ पासुन संपूर्ण १०० % टक्के वैधानिक सुचना छापण्याचा कायदा लागु होणार आहे . त्यामुळे अत्यंत संकटात व शेवटच्या घटका मोजत असलेला विडी उद्योग १ एप्रिल २०२१ पासुन आमलात येणाऱ्या कायद्यामुळे पुर्ण बंद झाल्याशिवाय राहणार नाही . म्हणुन केंद्रशासन , राज्यशासन व संपुर्ण देशाचे लक्ष्य वेधण्यासाठी अखिल भारतीय विडी उद्योग संघाने २५ फेब्रुवारी २०२१ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे .
केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने १ एप्रिल २०२१ पासुन आमलात आणणाऱ्या धुम्रपान कायद्याबाबत संपुर्ण देशातील विडी उद्योजक , विडी मालक संघ आणि विडी उद्योगात काम करणाऱ्या कामगार संघटना यांना सदर कायद्या आमलात आणण्यासाठी किंवा बदल करण्यासाठी सुचना मागविल्या त्यानुसार देशातील विडी उद्योगात संबंधित असलेल्या अनेक कामगार संघटना व मालक संघाने सुचनाही पाठविल्या त्याच धर्तीवर महाराष्ट्र कामगार सेनेचे दि . १८/०२/२०२१ रोजी सुचना पाठविले आहे . परंतु अद्यापही त्याचा विचार झालेला दिसुन आलेला नाही . म्हणजेच १ एप्रिल २०२१ पासुन हा कायदा लागु होणार असे दिसून येते .
तरी माननीयांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने सोलापूर जिल्ह्यातील विडी उद्योगात काम करणाऱ्या ७० ते ८० हजार कामगार व त्यांचा कुटुंबियांचा उपजिविकेचा विचार करून धुम्रपान कायद्यातुन विडी उद्योगाला वगळण्याचे शिफारस केंद्र शासनाला करावे ही . नम्र विनंती . असे नमुद करण्यात आले .
सदर निवेदनाचे प्रत मा. प्रधानमंत्री - भारत सरकार, नई दिल्ली, मा. आरोग्यमंत्री - भारत सरकार, नई दिल्ली, मा. कामगारमंत्री - भारत सरकार, नई दिल्ली, मा. मुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. कामगारमंत्री - महाराष्ट्र राज्य, मा. कामगार राज्य मंत्री - महाराष्ट्र राज्य. मंत्री महोदयांना पाठविण्यात आले आहे .
विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्ट मंडळात विठ्ठल कुऱ्हाडकर , दशरथ नंदाल , रेखा आडकी , अनिता बटगिरी , श्रीनिवास बोगा , शिवानंद येरटे , प्रसाद जगताप आदिचा समावेश होता.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.