तमीळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसामच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा.



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

तमीळनाडूसह पश्चिम बंगाल, आसाम, केरळ या राज्यामध्ये आणि पाँडिचेरी या केंद्र शासित प्रदेशात निवडणुका होणार आहेत.

तमीळनाडूसह पश्चिम बंगाल, आसाम, केरळ या राज्यांबरोबरच पुद्दूचेरी विधानसभा निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत निवडणुकांची घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होत असल्यामुळं हे सर्वांसाठी एक आव्हान असल्याचं अरोरा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. केंद्रीय बोर्डाच्या अर्थात सीबीएसईच्या परीक्षांपूर्वी या निवडणुका होतील, असंही अरोरा यांनी स्पष्ट केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये 8 तर, आसाममध्ये तीन टप्प्यात निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तमीळनाडू, पुद्दूचेरी आणि केरळ या दक्षिणेतील निवडणुकांसाठी एका दिवशी 6 एप्रिलला मतदान आहे. या सर्व निवडणुकांची मतमोजणी मात्र एकाच दिवशी होणार आहे. 2 मे रोजी या निवडणुकांचा एकत्रित निकाल लागणार आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

पश्चिम बंगाल

मुदत संपणार - 30 मे

आठ टप्प्यांत निवडणूक.


पहिल्या टप्प्यातील मतदान - 12 मार्च


दुसऱ्या टप्प्यातील मतदान - 1 एप्रिल


तिसऱ्या टप्प्यातील मतदान - 6 एप्रिल


चौथ्या टप्प्यातील मतदान - 10 एप्रिल


पाचव्या टप्प्यातील मतदान - 17 एप्रिल


सहाव्या टप्प्यातील मतदान - 22 एप्रिल


सातव्या टप्प्यातील मतदान - 26 एप्रिल


आठव्या टप्प्यातील मतदान - 29 एप्रिल.


▶️ *तमीळनाडू* 


मुदत संपणार - 24 मे

एकाच टप्प्यात निवडणूक

मतदान - 6 एप्रिल.

केरळ

मुदत संपणार - 1 जून

एकाच टप्प्यात निवडणूक

मतदान - 6 एप्रिल.

आसाम

मुदत संपणार - 31 मे

तीन टप्प्यांत निवडणूक

पहिल्या टप्प्यातील मतदान - 27 मार्च

दुसऱ्या टप्प्यातील मतदान - 1 एप्रिल

तिसऱ्या टप्प्यातील मतदान - 6 एप्रिल

 पुद्दूचेरी

सध्या राष्ट्रपती राजवट लागू

एकाच टप्प्यात निवडणूक

मतदान - 6 एप्रिल

Tags

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget