युवक आय क्राँग्रेसच्या सोलापूर जिल्हा कार्यध्यक्षपदी शंकर सुरवसे व पंढरपूर शहरकार्यध्यापदी सागर कदम यांची सर्वानूमते निवड करण्यात आली




सोलापूर // प्रतिनिधी

युवक क्राँग्रेस आयची मिटींग आज दिनांक 02/02/2021रोजी सोलापूर  येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असता.या मिटींगमध्ये पंढरपूर तालुक्यातील व जिल्ह्यातील काही दुष्काळी भागातील अनेक प्रश्नांसह महिला,युवती युवक गोरगरीब 

शिक्षक,वकील,पत्रकार,वृत्तविक्रेते,ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी सर्व जातीधर्माचा युवकांना बरोबर घेवून सामाजिक कार्य आणि यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणात आली.यावेळी क्राँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील व अनेक पदाधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.युवक क्राँग्रेसच्या माध्यमातून जनसामान्यांचे,अपंग,मूकबधिर,शेतकरी,कष्टकरी,शेतमजुर,विद्यार्थी,विद्यार्थीनी,बेरोजगारांना न्याय मिळवून देवून सर्व प्रश्न सोडवने बाबत नवनिर्वाचीत सोलापूर जिल्हाकार्यध्य शंकर सुरवसे व पंढरपूर शहरकार्यध्यापदी सागर कदम यांनी आश्वासन देवून आपली जवाबदारी पार पाडने साठी कटिबंध राहतील असे आश्वासन नव निर्वाचीत अध्यक्षांनी वरिष्ठांना दिलेले असून जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावातून युवकांनी या  सामाजीक कार्य  युवक क्राँग्रेस पक्षाची ताकद वाजवण्यासाठी  सहभाग घेने बाबतचे आवाहन सोलापूर जिल्हाकार्यध्यक्ष शंकर सुरवसे व पंढरपूर शहरकार्यध्यापदी सागर कदम यांनी केलेले आहे.वरील निवडी बाबत या सर्व मित्र मंडळींनी नव निर्वाचीतांचे अभिनंदण केले व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देताना शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे,युवक शहराध्यक्ष संदिप मांडवे,शिवसेना शहर उपप्रमुख तानाजी मोरे,राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष दादा थिटे,मल्हार आर्मीचे शहराध्यक्ष संतोष बंडगर, छत्रपती शासन युवा सेनेचे अध्यक्ष  गणेश जाधव,औकार चव्हाण, आकाश पवार,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget