सोलापूर // प्रतिनिधी
पंढरपूर सांगोला रस्त्यावर कासेगांव जवळ सकाळी बोलोरो गाडी व ट्रक यांचा भीषण अपघात झाला यामध्ये बलोरो गाडी मधील पाच भाविक जागीच ठार झाले तर या गाडीत सोळा जण प्रवास करत होते सात ते आठ जखमी झाले हे सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मधील रहिवासी असून ते पंढरपूर ला विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी निघाली होती परंतु काळा त्यांचा वाटेतच घात केला
जखमींना पुढील उपचारासाठी पंढरपूर येथे दाखल करण्यात आले या सर्वांना व मदतीची गरज होती त्यांनी राज्याचे माथाडी कामगार नेते शिवाजी पाटील यांना अपघाता विषयी माहिती दिली त्यांनी ताबडतोब मा श्री देवेंद्रजी फडवणीस यांना संपर्क साधून या अपघाताची माहिती दिली व त्या लोकांना तातडीने मदत करण्याची मागणी केली
या घटनेचा गांभीर्याने विचार करू माननीय श्री देवेंद्रजी फडवणीस यांनी आमदार प्रशांत परिचारक यांना मोबाईलवरून संपर्क साधून त्या सर्व लोकांना तातडीने मदत करण्याचे सांगितले मा. श्री .आमदार प्रशांत परिचारक हे दिल्लीवरून येत होते त्यांनी मा श्री विक्रम शिरसाट शहराध्यक्ष भाजपा यांना हॉस्पिटलमध्ये पाठवले त्यांना जी पाहिजेती मदत करण्याचे सांगितली त्यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते बंटी वाघ हे ही उपस्थित होते
रात्री पंढरपूर येथे पोचल्यावर आमदार प्रशांत परिचारक यांनी हॉस्पिटल मध्ये भेट देऊन अपघातात मयत झालेल्या डेड बॉडी त्यांच्या गावी पाठवण्यास त्यांना अंम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली व अपघातात जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना योग्य उपचार करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना यांना दिल्या

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.