दामाजी साखर कारखान्यावर काटा तपासणी भरारी पथकाची भेट, दामाजीच्या इतिहासात काटा रास्तच.

 



सोलापूर // प्रतिनिधी 

गुरुवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ रोजी दामाजी सहकारी साखर कारखान्यावर 'वजन काटा भरारी पथक' दाखल झाले होते. भरारी पथकाने अचानक कारखान्याच्या वजन काटे ची पाहणी करून तपासणी केली. या भरारी पथकामध्ये मा. सुधाकर माघाडे साहेब, नायब तहसीलदार मंगळवेढा, श्री किशोर धायफुले साहेब, लेखापरीक्षक सोलापूर, शिवाजी के. बगल सहायक निबंधक वैद्या मापन अधिकारी, सोलापूर व कांबळे एम आर साहेब, सोलापूर यांचा समावेश होता. त्यावेळी सदरच्या अधिकाऱ्यांना वजन काट्या मध्ये कोणताही दोष आढळला नाही. शेतकऱ्यांचा विश्वास, संत दामाजी साखर कारखान्यावर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चालू गळीत हंगाम जोमाने सुरू असून कारखाना गाळपाचे उद्दिष्ट निश्चितच गाठणार आहे. सदर प्रसंगी वर्स मॅनेजर सुहास शिनगारे, चीफ केमिस्ट मोहन पवार, शेती अधिकारी रमेश पवार,केनयार्ड सुपरवायझर प्रकाश पाटील, शेतकरी श्री नितिन इंगळे, आणि प्रवीण बिनवडे, वाहनधारक सुनील जाधव, नारायण हिराजी सानप, कामगार इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget