माजी आ.मा राजनजी पाटील व आ.यशवंत(तात्या)माने यांच्या पाठपुराव्याला यश
सोलापूर // प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा व नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मोहोळ तालुक्यातील घाटणे गावालगत सीना नदीवरील असलेल्या पुलासाठी ६ कोटी ९२ लाख व देखभालीसाठी १३ लाख हून अधिकचा निधी माजी आ.ऱाजनजी पाटीलसाहेब व विद्यमान आ.यशवंत(तात्या)माने साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने मंजूर केला आहे.
सदर चा निधी मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री मा ना उध्दवजी ठाकरेसाहेब,उप-मुख्यमंत्री मा ना अजितदादा पवारसाहेब व ग्रामविकासमंत्री मा ना हसनजी मुश्रीफ साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे आ.यशवंत(तात्या)माने साहेब यांनी यावेळी सांगितले आहे.
या पुलामुळे मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा व नागरिकांचा दळणवळणाचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागणार आहे. यामुळे माजी आ.राजनजी पाटील साहेब व आ.यशवंत(तात्या)माने यांचे समस्त मोहोळकरानी आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.