निधी जमा करावा अन्यथा आंदोलन तीव्र करु; बळीराजा शेतकरी संघटना

 



सोलापूर // प्रतिनिधी 

पंढरपूर तालुक्यातील गेल्या एक ते दिड वर्षाखाली भीमा नदीला  महापुराने वेढले होते त्यातीलच सुमारे 700 ते 800 नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासून गेल्या दोन वर्षापासून वंचित आहेत व यावर्षी ही अवकाळी पाऊस झाला यातील नुकसानग्रस्त बहुतांश शेतकरी पंचनामे होऊन सुद्धा वंचित आहेत पंढरपूर महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकार झालेला असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेल आहे एकीकडे निधी दिला म्हणून सरकार शेतक-यांना संपुर्ण नुकसान भरपाई दिल्याचे आव आणत असताना पंढरपूर तालुक्यातील शेतकरी मात्र गेले अनेक दिवस भरपाईपासुन वंचित आहेत 


 यामुळे सरकार विरोधी वातावरण निर्माण झालेले आहे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तातडीने हा निधी जमा करावा अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आज पंढरपूरचे तहसीलदार विवेक साळुंके यांना दिला.



 यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली भाऊ हळणवर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर, तालुकाध्यक्ष तानाजी सोनवणे मारुती कोळसे, दत्तात्रय व्यवहारे, सुरज भांगे, राजेंद्र नाईकनवरे, तानाजी सोनवले, मावली हरणावळे, ज्ञानेश्वर जवळेकर व शेतकरी बांधव उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget