"देगाव"गावने घालून दिला आदर्श, बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांपैकी झाले सरपंच व उपसरपंच - अभिजीत पाटील




(अभिजीत पाटील गटाच्या पुढाकाराने आदर्श गावचा संकल्प) 


पंढरपूर // प्रतिनिधी 

पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांनी यावर्षी अभिनव पद्धतीने ग्रामपंचायत निवडणूक लढविल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील श्री. अभिजीत पाटील यांनी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींसाठी १लाख रू.बक्षीस घोषित केले होते. तसेच नवनिर्वाचित व ग्रामपंचायत सदस्यांसाठी आदर्श पुरस्कार सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे मार्गदर्शन शिबीर ही आयोजित करण्यात आले होते.



देगाव हे तर श्री. अभिजीत पाटील यांचे मूळ गाव. या गावातही त्यांच्या पुढाकाराने ८ सदस्य बिनविरोध निवडून आले व त्यातील दोघांना सरपंच - उपसरपंच पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सरपंचपदी सौ. सीमा संजय घाडगे तर उपसरपंचपदी श्री. धर्मेंद्र कोंडीबा घाडगे यांची नेमणूक करण्यात आली असून, परस्पर सहमतीने इतर सदस्यांना पुढील कार्यकाळाची ही जबाबदारी देण्यात येणार आहे. गावातील नागरिकांना प्रोत्साहन दिल्यास आदर्श गावाकडे वाटचाल होऊ शकते याचे उदाहरण यामुळे प्रस्थापित झाले आहे. 


अभिजीत पाटील गटातील प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांना काम करण्याची संधी मिळणार असून गावांचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतो, या भूमिकेतून गावाच्या विकासासाठी त्यांचा कायम पुढाकार असतो असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget