पांडुरंगा आलो आम्ही तुमच्या भेटीला कृषी विधेयकाच्या रूपाने स्वातंत्र्य मिळाले माझ्या माय बापाला




वृत्तसंस्था // प्रतिनिधी    

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. हे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी मार्केट कमिटीचे दलाल, संचालक व शेतमालाचे कमिशन खाऊन आजपर्यंत जगत असलेली मंडळी या कृषी विधेयकाला विरोध करून शेतकऱ्यांना मनात गैरसमज पसरवत आहेत. पण खरं पाहिलं तर या कृषी विधेयकामुळे शेतकरी मार्केट कमिट्यांच्या जोखंडातून मुक्त झाला आहे. आज पंढरपूर येथे कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ भगवान श्री.पांडुरंगाला प्रदक्षणा घालून सरकारने कृषी सुधारणा विधेयक स्थगित करू नये असे साकडे घातले.

      यावेळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर, दीपक भोसले, सुहास पाटील, माऊली हळणवार, अजय बागल, शिवशंकर जगदाळे, विनायक जाधव, अमर पवार, राहुल बिडवे तसेच शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget