पंढरपूर – मंगळवेढा विधान सभा मतदार संघाचे आ. भारत भालके यांच्या निधनामुळे मतदारसंघ काही महिन्यांपासून पोरका झाला आहे. फेब्रुवारीमध्ये 13 तारखेला त्यांचा जन्मदिवस असतो. याच दिनाचे औचित्य साधत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके मतदार संघातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी संवाद यात्रेचे आयोज केले आहे. यात्रेचा शुभारंभ राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून भगीरथ भालके या माध्यमातून पंढरपूर -मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावा गावात जाऊन सर्व सामान्य जनतेशी संवाद साधणार आहेत, तसेच भालके यांच्या दुःखद निधन प्रसंगी सहवेदना व्यक्त करीत धीर दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्याचा हेतू असल्याचे समजले जात आहे.
शनिवारी सायंकाळी चार वाजता मंगळवेढ्यातील आठवडा बाजार चौकातून या जनसंवाद यात्रेस शुभारंभ होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहोळचे माजी आ. राजनजी पाटील हे असणार आहेत. तर आ.प्रणितीताई शिंदे, आ. संजयमामा शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक (आबा) साळुंखे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम (काका) साठे, चांदापुरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के, आरपीआय कवडे गटाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले आदी मान्यवर या जनसंवाद यात्रेसाठी उपस्थित राहणार आहेेेत.
आ.भारत भालके यांच्या निधनानंतर अनेकांनी प्रत्यक्ष भेटून मतदारसंघातील अपूर्ण कामे करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सर्वतोपरी प्रयत्न करू आणि कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे बोलून दाखवले. मतदार संघातील अनेक गोरगरीब माय – माता, बंधू – भगिनी, कष्टकरी शेतकरी यांनी पाठीशी उभे राहून मोठा आधार दिला. या त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी थेट त्यांच्यापर्यंत जाऊन संवाद साधण्यासाठी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.असे भगीरथ भारत भालके यांनी यावेळी सांगितले


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.