तळोजा MIDC मध्ये Chemical कंपनीला लागली भीषण आग:

 



तळोजा एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनीला भीषण आग तसेच या आधीही काही महिन्या पूर्वी सुद्धा अशी आग होती.


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

तळोजा औद्योगिक वसाहतीत एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सूरू आहे.


अग्निशमन दल घटनास्थळी दाखल


शॉक सर्किटमुळे आग लागली असावी प्राथमिक अंदाज :

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अझीवो क्रिस्ट ऑरगॅनिक प्रा. लिमिटेड या न्यू केमिकल झोन येथील केमिकल कंपनीला आज सकाळी 11 च्या सुमारास भीषण आग लागली. शॉक सर्किटमुळे ही लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. कोणत्याही जीवितहाणीची अद्याप माहिती समोर आली नसली, तरी अर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

एक महिन्याआधी सुद्धा लागली होती आग -

जवळपास एक महिन्याआधी औद्योगिक क्षेत्रात भूखंड क्रमांक जे-39 वर असलेल्या मोदी केमिकल या रसायनांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला आग लागली होती. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. या घटनेत एका अग्निशमन दलाच्या कर्मचाराऱ्याचा मृत्यूही झाला होता. तसेच अन्य जखमी जवानांना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget