(कारखाना सर्व उत्पादनात आघाडीवर,आ. प्रशांतराव परिचारक)
सोलापूर // प्रतिनिधी
श्रीपूर ता.माळशिरस येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2020-21 मध्ये उत्पादित केलेल्या 9,01,111 व्या साखर पोत्याचे पूजन कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन आ.श्री प्रशांतराव परिचारक, व्हाईस चेअरमन श्री वसंतराव देशमुख, श्री.दिनकरराव नाईकनवरे माजी सभापती व कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन श्री.बाळासाहेब सालविठ्ठल, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी सध्याच्या कोवीडच्या१९च्या, परिस्थितीस अनुसरुन शासनाने घालून दिलेले सर्व नियम व अटींचे काटेकोर पालन करणेत आले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होऊन 124 दिवसाचा कालावधी पुर्ण झालेला असून या हंगामात कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, उत्पादन विभाग, रसायन विभाग, शेती विभाग, डिस्टीलरी विभाग, अकौंट विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सुयोग्य नियोजनाने 8,31,667 मे.टन गाळप करुन 9,01,111 क्विंटल साखरपोती उत्पादीत केली आहेत. कारखान्याचा को-जनरेशन प्रकल्प व डिस्टीलरी प्रकल्प यामधूनही चांगले उत्पादन सुरु असून कारखान्याच्या को-जन मधून 5.42 कोटी युनिट वीज निर्माण करुन 2.82 कोटी युनिट वीज एम.एस.ई.बी. ला विक्री केली आहे. तसेच आसवनी प्रकल्पामधून 66 लाख लिटरचे उत्पादन घेतलेले आहे. कारखान्याकडे आणखी सुमारे 2 लाख मे.टन ऊस उपलब्ध असून कारखाना 25 मार्च 2021 पर्यंत चालवून उपलब्ध सर्व ऊसाचे गाळप करणार आहे.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऑक्टोंबर महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने नदी व ओढा काठावरील उस पाण्यामध्ये जाऊन त्याचे नुकसान झाले होते. कारखाना व्यवस्थापनाने अशा पुरग्रस्त झालेल्या ऊसाचे लवकरात लवकर गाळप केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान झाले नाही. तरीही गतवर्षीच्या तुलनेत कारखान्याचा या वर्षीचा साखर उतारा चांगला राहीलेला आहे. कारखान्याने 25.77 लाख लिटर B हेव्हीचे उत्पादन करुन त्यासह साखर कारखान्याचा साखर उतारा 11.30 टक्के असून हा साखर उतारा जिल्हयामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे. उर्वरित संपूर्ण ऊसाचे लवकरात लवकर गाळप करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे.
यावेळी सभापती जयश्री व्हरगर, उपसभापती विवेक कचरे, माजी सभापती भगवानराव चौगुले, उपसभापती प्रशांत देशमुख, विष्णु रेडे, भाजप तालुकाअध्यक्ष भास्करराव कसगावडे, संचालक श्री दिनकरभाऊ मोरे, श्री.दिलीपराव चव्हाण, चंद्रकांत देशमुख, भैरु माळी, तुकाराम डुबल, दाजी भुसनर, हरीदास शिंदे, बाळासाहेब माळी, धोंडीराम पाटील, भजनदास फाळके, वसंत पाटील, राजूबापू गावडे, सिताराम नागणे, शिवाजी कोळवले, पुरुषोत्तम पवार व कारखान्याचे संचालक श्री हरिषदादा गायकवाड, श्री.शिवाजीराव साळुंखे, श्री.ज्ञानदेव ढोबळे, श्री.सुरेश आगावणे, श्री.बाळासोा यलमार, श्री.तानाजी वाघमोडे, श्री.महीबुब शेख, श्री.नामदेव झांबरे, श्री.दिनकरराव कवडे, श्री.आनंदराव आरकिले, श्री.परमेश्वर गणगे, श्री.नागन्नाथ शिंदे, श्री.भिमराव फाटे, श्री.अरुण घोलप आदि उपस्थित होते. साखर पोती पूजनास उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी मानले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.