सोलापूर // प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील गिरवी कणसे वस्ती येथे संतोष पवार या शेतकऱ्याच्या खिलारी जातीच्या गायला एका वेळेला तीन वासरे झालेली आहेत. त्यामध्ये दोन खोंड व एक कालवड. ही आश्चर्यकारक गोष्ट पाहण्यासाठी परिसरातील नागरिक येत आहेत. संतोष पवार यांना पहिल्यापासूनच देशी खिल्लारी गाई पालन करण्याची आवड आहे. सध्याची वासरे झालेली गाई ही सुद्धा लहान वासराची मोठी गाई त्यांनी पालन पोषण करून सांभाळली आहे. या गाईला गोंडस अशी तीन वासरे झालेली आहेत. तीनही वासरे सदृढ आहेत. खिल्लारी देशी गाई पशुवंश पैदाशीसाठी त्यांनी पाळली आहे. संतोष पवार गाईला पवित्र मानतात. सर्वत्र हिंदू धर्मामध्ये गाईला दैवत मानतात. तिच्या दुधापासून गोमूत्र, शेन व दुधाच्या उपपदार्थापासून अनेक गुणकारी औषधे बनवता येतात. त्यांच्या गाईला तीन वासरे एका वेळेला झाल्यामुळे त्यांना आनंद झाला आहे. तर परिसरातील नागरिक पाहण्यासाठी येत आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.