महावितरण कंपनीकडून होणारी सक्तीची वीज बिलाची वसुली थांबवावी:सुनिल चव्हाण




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे राज्यात वीज बिलाची सक्तीची वसुली केली जात असून शेतक-यांच्या विजेचे ट्रान्सफार्मर सोडविले जात आहेत.व घरगुती वीज तोडणी केली  जात  आहे.   या विरोधात मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोहोळ येथे  पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग वरील   पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चौकात ( इंदिरा कन्या प्रशाले जवळ) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गेली वर्षं झाले कोरोना महामारी अतिवृष्टी यामुळे शेतकरी अडचणीत असताना राज्य शासन  वीज महावितरण कंपनी मार्फत विजेची सक्तीची वीज बिलाची वसुली करत आहे याच्या विरोधात मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक 22/3/2016 रोजी दुपारी 12 वाजता नॅशनल हायवे वरील  राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ( इंदिरा कन्या प्रशाला जवळ)  महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात उपस्थित शेतकरी व कार्यकर्ते यांनी प्रचंड घोषणा दिल्या व परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीचे नेते लोकसेवक संजय आण्णा क्षीरसागर. म्हणाले. की महाविकास आघाडी सरकार कोरोना महामारी व  अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतक-यांना आणखी संकटात टाकण्याचे काम करत आहेत. विजेचे कनेक्शन ट्रान्सफार्मर सोडविले जात आहेत अशा शेतकरी विरोधी सरकारला खाली खेचा असे आव्हान संजय आण्णा क्षीरसागर यांनी केले. भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव नाना वाघमारे.  मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण. मोहोळ शहर भाजप अध्यक्ष सुशील भैय्या क्षीरसागर. तालुका सरचिटणीस सतीश दादा पाटील. किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष युवा नेते फंटू गोफणे. यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. 



यावेळी लोकसेवक संजय आण्णा क्षीरसागर, शंकरराव नाना वाघमारे, सुनील चव्हाण, अध्यक्ष सुशील भैय्या क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष पांडूरंग आण्णा बचुटे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पवार, उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष लिंगदेव निकम,  मुजीबभाई मुजावर, सुनील पाटील, श्रीकांत महाराज शिवपुजे, शहाजी देशमुख, महावीर पुजारी, महेश धुमाळ, भारत आवारे पैलवान, औदुंबर वाघमोडे, बाबासाहेब जाधव, श्रीकांत लांडगे, मोहोन तात्या होनमाने, जेष्ठ नेते बाळासाहेब पाटील, अंबादास भोसले, सागर लेंगरे, शेजबाभुळगावचे सरपंच दिपक गवळी, विशाल पवार, जगन्नाथ वसेकर, दिगंबर वसेकर, युवराज ढेरे, रमेश भानवसे, प्रदीप आमले, शशीकांत गावडे, आनंद गावडे, विष्णूपंत चव्हाण, विवेक पाटील, स्वप्नील डोंगरे, बालाजी चव्हाण, दिनेश गडदे, प्रशांत गाढवे, गुरुराज तागडे, जालिंदर खंदारे, विकास वाघमारे, भाउराव सोनटक्के, आत्माराम राठोड, जेष्ठ नेते मधुकर शिरसट गुरुजी. आदी उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश झाडे यांनी केले सुत्रसंचालन सतीश दादा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार तालुका अध्यक्ष सुनील दादा चव्हाण यांनी मानले यावेळी रोडच्या दोन्ही बाजूला वाहणांची मोठ्या प्रमाणात  लाईन लागली होती.   


यावेळी निवेदन मोहोळ विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांनी स्विकारले यावेळी मोहोळ पोलीस स्टेशनचे  कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अशोक  सायकर साहेब, हेड काॅन्सटेबल निलेश देशमुख साहेब, व त्यांच्या स्टाफने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget