विठ्ठलाच्या विरोधात आता दामाजीपंतांची थेट लढाई!? भाजपाकडून समाधान आवताडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर!

 


अखेर उद्योगपती समाधान दादा आवताडेवताडे यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी जाहीर? ज्यांचे काम मनापासून आतुरलेले होते अशा सर्व पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील समस्त मतदारांना सांगण्यात येत आहे की 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत साठी दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्योगपती समाधान दादा अवताडे यांचे नाव आज मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये फायनल झाले असून याची अधिकृत घोषणा आज संध्याकाळपर्यंत होण्याची दाट शक्यता भारतीय जनता पार्टीच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी‌ वर्तवली आहे. 


यामुळे आता थेट विठ्ठला च्या विरोधात दामाजीपंतांची लढाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे याबाबत काही मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की जवळजवळ समाधान दादा अवताडे यांचे नाव निश्चित करण्यात आले असून सर्व पक्षप्रमुखांच्या व स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार व अहवालानुसार समाधान दादा अवताडे हे एकच नाव अंतिम होईल, याबाबत थोड्याच वेळात जाहीर पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा पक्षाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget