सोलापूर // प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या पंढरपूर शहराच्या एकदम नजीक असणाऱ्या चिंचोली भोसे ग्रामपंचायतीच्या झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये चिंचोली भोसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रतन रमेश सुतार यांची तर उपसरपंचपदी सौ. राधाबाई गणपत पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे या सरपंच उपसरपंच निवडी चिंचोली भोसे येथेच घेण्यात आल्या. साधारणता रतन रमेश सुतार यांची आ. प्रशांतराव परिचारक गटाकडून सरपंच पदी वर्णी लागली असून तर सौ. राधाबाई गणपत पवार यांची माढा विधानसभा मतदार संघाचे आ. बबनदादा शिंदे व स्व. भारत भालके, यांच्या गटाकडून निवड करण्यात आली असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.
या निवडी प्रसंगी मा. ग्रा. सदस्य परमेश्वर पवार, गणपत पवार, गणपत गायकवाड, विजय पाटील, बाळासाहेब पवार, प्रशांत पवार, बबलू पवार, आबा पवार, गणेश पाटील, अनिल कांबळे, शैलेश पवार,अक्षय पवार,राजाराम पवार,वसंत पवार,संभाजी पवार,माऊली शिंदे,काका लोखंडे शरद क्रीडा प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष गणेश गोडसे संभाजी, ब्रिगेड, पुणे विभाग अध्यक्ष किरण घाडगे, संदीप पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ.बबन दादा शिंदे आ. प्रशांत परिचारक,भगीरथदादा भालके यांनी अभिनंदन केले

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.