सोलापूर // प्रतिनिधी
कै. आ. भारतनाना भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याचा मुलगा म्हणून संजय माने यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली असून येणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी व गोरगरिबांच्या बऱ्याच वर्षांपासून असलेल्या अडीअडचणी सोडण्यासाठी मी तयारी केली आहे.
सर्व गोरगरीब वंचित व सामान्य घटकातील सर्व पीडितांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी माझी उमेदवारी जाहीर केल्या असून या माध्यमातून मी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तीन लाख बत्तीस हजार मतदारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याचे यावेळी संजय माने यांनी सांगितले यशवंत सेना बारा बलुतेदार महासंघ व इतर आघाडीच्या माध्यमातून मी उमेदवारी जाहीर केले. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा रस्त्यांची प्रश्न असो व इतर सर्व मूलभूत प्रश्न अडचणी सोडण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे यावेळी श्री संजय माने यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले यावेळी त्यांनी सर्व पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी मला मतदान करून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.