महाराष्ट्र यशवंत सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मा. संजय (भाऊ) नागनाथ माने कोर्टी ता. पंढरपूर (वय 32) हे यंदाच्या मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाली आहे. गोपीचंद पडळकर साहेबांचे विश्वासू मित्र तसेच मंगळवेढा पंढरपूर तालुक्यामधील गोपीचंद पडळकर साहेबांचा उजवा हात समजणारे संजय (भाऊ) माने ज्यांनी मंगळवेढा पंढरपूर तालुक्यामध्ये आजपर्यंत भरपूर सामाजिक, शैक्षणिक, गोरगरिबांसाठी मदत, देवस्थानासाठी सहकार्य, दुष्काळी भागात टँकरद्वारे मोफत पाणी वाटप असे खुप उपक्रम त्यांनी समाजासाठी केले आहेत. तसेच *एकच छंद गोपीचंद* समाजसंघटक मा. श्री. संजय (भाऊ) माने यांचे तर्फे नूतन विद्यालय कोर्टी येथे 500 विद्यार्थ्यांसाठी ताशी 250 लिटर पाणी फिल्टर होईल, इतका मोठा फिल्टर त्यांनी मोफत दिला. महादेव मंदिर कोर्टी येथे सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. मंगळवेढा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक फक्त एका महिन्यावर आली असून उमेदवार व त्यांचे सच्चे कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत.
प्रत्येक उमेदवार आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी सज्ज झाला आहे.
तसेच मागील दुष्काळाच्या वेळेस सलग तीन वर्ष कोर्टी येथील बादलवाडी, कासेगाव तसेच पंढरपुरातील अनेक ठिकाणी मोफत पाण्याचा टँकर देण्याचे काम तसेच कोर्टी येथील शिवशंभु मंदिर या मंदिरास संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही फुटेज व सर्व भाविक भक्तांना बसण्याची सोय व्हावी, यासाठी सर्वांना बैठक व सर्व मंदिर परिसरात तारेचे कंपाउंड मोफत करून देण्याचे काम संजय माने यांनी केले आहे. तसेच लोटेवाडी येथील म्हशीखान राजा या मंदिरास पाच ब्रास पेविंग ब्लॉक देण्याचे काम संजय माने यांनी केले आहे.तसेच गोरगरिबांच्या अनेक सुखदुःखाच्या प्रसंगी धावून जाण्याचे काम व सर्व युवकांना एकत्रित करून समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टीला विरोध करून बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीदवाक्य सर्व युवकांच्या हृदयामध्ये प्रेरणेचे काम संजय माने यांनी केले आहे. म्हणून बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर व कैलासवासी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक (मालक) यांच्या आशीर्वादाने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी संजय माने हे अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवणारच असा ठाम निर्धार केला आहे आणि म्हणून सर्व बहुजन समाजातील युवकांनी मतदाराने संजय माने यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विठ्ठल रुक्मिणी तसेच मंगळवेढ्याचे दामाजीपंत कोर्टी चे जागृत देवस्थान शिवशंभो यांच्या कृपाशीर्वादाने संजय माने यांचा आवाज विधानसभेमध्ये निश्चित पणाने घुमणार आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.