सोलापूर // प्रतिनिधी
महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने महिला रोजगार पुर्नवसन ' मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे . सोलापूर शहरात विडी , यंत्रमाग , बांधकाम , व्हेटबिगारी , धुणे - भांडी व इतर असंटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात महिला काम करतात . शहरात महिलावर आधारित असलेले अनेक कुटुंब आहत . पंरतु सध्या महिला काम करीत असलेल्या अनेक उद्योग बंद पडले आणि काही उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत , अशा परिस्थितीत महिलांचे रोजगार पुर्नवसन करण्यासाठी अत्यंत गरजेचे असल्याने याबाबत महिलांना पर्यायी उद्योगाबाबत जनजागृती व उद्योग निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने १० मार्च बुधवार रोजी सायं , ५ वाजता माँ साहेब विडी कामगार घरकुल वसाहत कुंभारी येथे ' महिला रोजगार पूर्नवसन आयोजन करण्यात आली आहे . सदर मेळाव्यास कामगार नेते विष्णु कारमपुरी ( महाराज ) हे मार्गदर्शन करणार आहेत.
तरी सर्व महिला माता भगिनींनी मेळाव्यास उपस्थित रहावे असे आव्हान माँ साहेब घरकुल वसाहतीचे व्यवस्थापक श्रीनिवास चिलवेरी यांनी केले आहे .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.