भारतात सोलापूर ची महानगरपालिका ठरली १७व्या क्रमांकाची!




(राज्यात ४था क्रमांक मिळाला)


साेलापूर // प्रतिनिधी 

केंद्र सरकारच्या शहरी आवास व कार्यासन मंत्रालयाने राहण्यासाठी उत्तम शहर (एज ऑफ लिव्हींग इंडेक्स) अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात साेलापूर हे देशातील १७ वे आणि राज्यातील चाैथे राहण्यायाेग्य शहर ठरले आहे. कृत्रिम पाणी टंचाई, धुळीबद्दल लाेक तक्रार करीत असले तरी साेलापूरची महापालिका ही लयभारी असल्याचा निष्कर्ष नागरिकांनी काढल्याचा दावा या सर्वेक्षणाच्या निकालातून आला आहे.


केंद्र सरकारने २०१९-२० या वर्षात स्मार्ट सिटींसाठी हे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात देशातील ११४ शहरांनी सहभाग नाेंदविला. साेलापूचा २०१६ मध्ये स्मार्ट सिटी याेजनेमध्ये समावेश झाला हाेता. स्मार्ट सिटी कंपनीकडून यात सहभाग नाेंदविण्यात आला. या सर्वेक्षणात शहरातील व्यवसाय, शैक्षणिक व्यवस्था, आराेग्य व्यवस्था, परवडणारी घरे, स्वच्छता, पिण्याचे पाणी, दळणवळणाची साधने, मैदाने, महिला सुरक्षा, व्यवसायाच्या संधी, बॅंकिंग सेवा अशा विविध माहितीचे सादरीकरण करण्यात आले. १ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत लाेकांकडून एका ॲपवर मतेही मागवण्यात आली. याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आला. या सर्वेक्षणाचा निकाल जाहीर झाला असून साेलापूर स्मार्ट सिटीला देशात १७ वे आणि राज्यात चाैथे मानांकन प्राप्त झाले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget