कोरोना लपवू नका ! लक्षणे असतानाही आजार अंगावर काढलेल्या 'इतक्‍या' रुग्णांनी गमावला जीव




सोलापूर // प्रतिनिधी 

शहर-जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. लक्षणे असलेल्यांनी तत्काळ उपचार घ्यावेत, असे आवाहन करूनही कोरोना लपविणाऱ्यांची संख्या मोठी राहिली आहे. या पार्श्‍वभूमीवर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये अशा व्यक्‍तींचाच सर्वाधिक समावेश असल्याची बाब अहवालावरून समोर आली आहे. आतापर्यंत शहर-जिल्ह्यातील एक हजार 919 मृत्यूमध्ये उपचारासाठी दाखल झाल्यानंतर 28 तास ते 72 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये 683 रुग्णांचा समावेश असल्याचेही स्पष्ट झाले आहे.


महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने एक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये उपचारासाठी दाखल झाल्यानंतर 24 तासांत, 24 ते 48 तासांत, 48 ते 72 तासांत आणि तीन ते सात दिवस व सात दिवसानंतर मृत्यू होणाऱ्यांची आकडेवारी स्वतंत्र नोंदविण्यात आली आहे. कोरोना झाल्यानंतरही लक्षणे लपवून आजार अंगावर काढत बिनधास्तपणे घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय दिसत आहे. कोरोनाच्या विषाणूचा अंगात मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्यानंतर अनेकजण उपचारासाठी दवाखान्यात दाखल होत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. तीन ते सात दिवस अथवा सात दिवसानंतर मृत्यू होणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. मात्र, उपचार सुरु झाल्यानंतर 48 तास ते 72 तासांत मृत्यू होणाऱ्यांचेही प्रमाण खूप आहे. कोरोना हा आजार न लपविता लक्षणे असलेल्यांनी वेळेत उपचार घेतल्यास रुग्ण निश्‍चितपणे त्यातून बरे होऊ शकतात. त्यामुळे लक्षण असलेल्यांनी कोणताही विलंब न लावता वेळेत निदान करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


मृत्यू झालेले रुग्ण (कंसात शहरातील रुग्ण) 

एकूण मृत्यू 

1,919 

24 तासांतील मृत्यू 

292 (159) 

24-48 तासांतील मृत्यू 

116 (58) 

48-72 तासांतील मृत्यू 

129 (61) 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget