अमरावती जिल्ह्यातील सर्व सभासद कलाकारांना शासनाकडून आर्थिक मदत प्राप्त होण्यासाठी संघटनाने दिली मा. विभागीय आयुक्त यांना सविस्तर माहिती
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघ च्या वतीने कलाकारांच्या समस्या बाबत तसेच शासना कडून अमरावती जिल्यातील सर्व कलाकारांना आर्थिक मदत मिळेण्याकरिता सविस्तर माहिती निवेदना द्वारे मा. विभागीय आयुक्त तसेच मा. जिल्हाधिकारी अमरावती यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य शासनाला पाठविण्यात आलेली आहे आणी कोरोना महामारी मुळे संगीतक्षेत्रातील सर्व कार्यक्रम विवाह धार्मिक कार्यक्रम तसेच मंगल कार्यालय साउंड या सर्व लोकांचे उदरणीवहाचे कार्यक्रम संपूर्ण बंद असल्यामुळे आज कलाकारावंर उपास मारीची वेळ आली आहे तरी हे सर्व कार्यक्रम सुरळीपणे सुरु करून लग्न समारंभामध्ये संगीत क्षेत्रातील कलाकारांचा समावेश राहील असे आदेशा मध्ये नमूद करण्यात येईल असेल मा. जिल्हाधिकारी यांनी आस्वासन दिलेले आहे आणी कलाकारांच्या आर्थिक मदतीचा सविस्तर अहवाल करून शासनाकडे पाठविण्यात येईल या संबंधित केलेल्या कार्यवाही ची माहिती आपणास पत्र व्यवराने काळविण्यात येईल असे सांगितले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.