नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे पैसे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा होतील:शहाजहानभाई शेख




(शहाजहानभाई शेख यांनी जपला माणुसकी धर्म)


सोलापूर // प्रतिनिधी 

अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या पंढरपूर तालुक्यातील सर्व गोरगरीब व कष्टकरी शेतकऱ्यांचे पैसे महाराष्ट्र राज्य सरकारने पंढरपूर येथील तहसील कार्यालयाकडे वर्ग केले आहेत पण पंढरपूर येथील तहसील कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे हे सर्व पैसे ज्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होते ते न होता इतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ते जमा होत आहेत यामध्ये काही बँका अधिकाऱ्यांचा सुद्धा बेजबाबदारपणा पुढे आलेला आहे. त्याच बरोबर ही सर्व रक्कम त्याच्या लाभार्थी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा करण्यात यावी. यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक शहाजहान भाई शेख यांनी, पंढरपूर येथील कर्तव्यदक्ष तहसील कार्यालय तहसीलदार सुशील बेलेकर साहेब यांची आज त्यांच्या ऑफिसमध्ये भेट घेऊन हे सर्व पैसे तातडीने जमा करण्यात यावी अशी मागणी केली यावेळी कर्तव्यदक्ष तहसीलदार बेल्हेकर यांनी शेख यांना आश्वासन देऊन आपली मागणी लवकरात लवकर विचारात घेऊन हे सर्व पैसे त्याच्या सर्व गोरगरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर ती लवकरात लवकर जमा होतील असे सांगितले याबाबत सर्व पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होताना दिसून येत आहे.

यावेळी नवनाथ मोहिते, अजित बनसोडे, विजय गवळी, संतोष सलगर, राजाभाऊ व्यवहारे व पंढरपूर तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी बांधव यावेळी तहसील कार्यालय पंढरपूर येथे उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget