वाळुमाफियाची मुजोरी, भरारी पथकातील महसूल कर्मचारी यांना केली मारहाण पोलिसात गुन्हा दाखल.




 वृत्तसंस्था // प्रतिनिधी

माण तालुक्यातील ढाकणी येथे वाळुमाफियाची मुजोरी,अवैध वाळू वाहतुक करणार्या पिकअप गाडी वर कारवाई करत असलेले मंडलाधिकारी  शरद सानप, सिद्धार्थ जावीर यांना जिवे मारण्याची धमकी देत दमदाटी करून शिवीगाळ करून मारहान करण्यात आल्याची घटना घडली असून माण तालुक्यात या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची फिर्याद पळशी ता.माण येथील रवि राजेंद्र खाडे व इतर 25जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. 


याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी 25रोजी रात्री माणच्या तहसीलदार सौ बी एस माने यांच्या आदेशान्वये माण तालुक्यातील भरारी पथक ढाकणी-पानवन रोड लगत टाटा डीआय 207 वाहन क्रमांक एमएच 50-5069 पिकअप मधून अवैध वाळू वाहतुक करत असलेली माहिती भरारी पथकातील मार्डीचे मंडळाधिकारी शरद दादासाहेब सानप, शिंगणापूरचे मंडलाधिकारी सिद्धार्थ जावीर, गोंदवले बु मंडलाधिकारी भरत कर्णे व दहिवडचे तलाटी श्याम सुर्यवंशी हे रात्री 9:30वाजता ढाकणी येथे आले व अवैध वाळू वाहतुक करत असलेले पिकअप वाहन पकडले. 

        या नंतर वाहनाचा चालक रवि राजेंद्र खाडे हा वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना 6हजार रूपये  किमतीची 1ब्रास वाळू स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी करत होता. म्हणून चालकास सदर वाहन म्हसवड पोलिस ठाण्यात घेऊन चल असे सांगितले असता त्याने जवळ च्या मोबाईल वरून फोन केले असता लगेच 6-7टु व्हिलर गाड्या आल्या व 20-25जण जमा झाले व त्यांनी सदर वाहन पुढे पोलिस ठाण्यात घेऊन जायचं नाही.असे म्हणून भरारी पथकातील मंडलाधिकारी यांना मोठमोठ्याने  शिवीगाळ व दमदाटी करून , चालक रवि राजेंद्र खाडे व इतर जमावाने भरारी पथकातील मंडलाधिकारी व तलाटी यांना हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहान केली.


या वेळी जमावाने शासकीय कामात अडथला आणून भरारी पथकातील महसूल विभागाचे कोण कोण आले आहे. त्यांना शोधून मारा आज त्यांना येथून जाऊ देऊ नका. असा आरडा ओरडा करत पुन्हा मारहान केली व सदरचे वाहन पळवून घेऊन पसार झाले. 

      शासकीय कामात अडथला आणून महसूल विभागातील भरारी पथकातील मंडलाधिकारी व तलाटी यांना  मारहान करून वाहन पळवून नेहल्या प्रकरणी पळशी येथील रवि राजेंद्र खाडे व इतर 20-25जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि बाजीराव ढेकले करत आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget