सोलापूर // प्रतिनिधी
252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आजप्रचार शुभारंभ प्रसंगी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान महादेव आवताडे यांच्या प्रचारात भारतीय जनता पार्टीचे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी विकास आघाडी सरकार विरोधामध्ये जोरदार फटकेबाजी करत संपूर्ण दीड वर्षाचा महाविकास आघाडीचा खरपूस समाचार घेतला यावेळी त्यांनी सचिन वाजे यांच्या संपूर्ण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती सर्व प्रसिद्धी माध्यमांना दिली त्याबाबत त्यांनी सांगितले की रोज नवनवीन एकेक खुलासे होत असून यामध्ये शंभर कोटी प्रकरणाबाबत बोलायला मा विकास आघाडी चा कोणताही मंत्री किंवा पदाधिकारी समोर यायला तयार नाही यावेळी त्यांनी 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी समाधान दादा अवताडे यांना निवडून देण्याचे आवाहन आणि सर्व उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक की आमदार प्रशांतराव परिचारक यांनी जो त्याग केला आहे. त्याची आठवण यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी सर्वांना करून दिली. पंढरपूर मंगळवेढा चा विकास करायचा असेल तर समाधान अवताडे यांच्या पाठीमागे खंबीरपणे सर्वांनी उभे राहावे व जास्तीत जास्त मताधिक्क्याने समाधान दादा अवताडे यांना विजयी करावे अशी या चंद्रकांत दादा पाटील म्हणाले.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमासाठी माजी मंत्री व पक्षनिरीक्षक बाळा भाऊभेगडे,माजी मंत्री राम शिंदे, संभाजी पाटील निलंगेकर, आ. गोपीचंद पडळकर, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर,खा. डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख, आ.विजयकुमार देशमुख, आ. रणजित मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख, आ. प्रशांतराव परिचारक, उमेशराव परिचारक,आ.सचिन कल्याणशेट्टी,आ.राम सातपुते, लक्ष्मणराव ढोबळे,रिपाईचे राजाभाऊ सरवदे, यांचबरोबर संपूर्ण पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील व भारतीय जनता पार्टी तिल सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.