सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसचा गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ व महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात हल्लाबोल व थाळीनाद अंदोलन




सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापुर शहर जिल्हा महिला काॅग्रेसच्या वतीने गॅस, पेट्रोल, डिझेलचे गगनाला भिडलेल्या भाववाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा तथा महाराष्ट्र प्रदेश महिला काॅग्रेसच्या प्रभारी आमदार कु.प्रणितीताई शिंदे व शहर अध्यक्ष मा प्रकाश वाले यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला अध्यक्षा कु.हेमा चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विरोधात निषेध करुन थाळीनाद अंदोलन करण्यांत आले.


 गॅस,पेट्रोल, डिझेल च्या गगनाला भिडलेल्या किमती, जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला यावरील सरकारचे नसलेले नियंत्रण, या मुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी असून गृहिणी मेटाकुटीस आल्या आहेत. फसलेली नोटबंदी,करोनाच्या काळात बंद झालेले छोटेमोंठे उद्योगधंदे, दोन कोटी रोजगार आणि अच्छे दिन यांस लावलेल्या वाटाण्याच्या अक्षता या मुळे बेकारी वाढून नोकरीविना कित्येक संसार उधवस्थ झाले आहेत. तसेच लहान मुली व स्त्रियांवरील अत्त्याचार यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या विविध मागण्यासाठी मोदी सरकारच्या

विरोधात चले जाओ मोदी , मोदी भगाओ, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा देवून थाळीनाद करुन हल्लाबोल केला महिलांनी परिसर दणाणून सोडला होता.


तसेच यासंबंधीचे निवेदन मा.जिल्हाअधिकारी यांना देण्यात आले.


यावेळी म.प्र.महिला काॅ.च्या सचिवा अॅड.करिमुन्निसा बागवान, उपाध्यक्षा प्रमिला तुपलवंडे,विणा देवकते,शोभा बोंबे,रतन डोळसे,लता गुंडला,अंजली मंगोडेकर, निता बनसोडे,चंदा काळे,मुस्कान शेख,अरुणा बेंजरपे,संतोषी गुंडे, पारुबाई काळे,मुमताज तांबोळी, बसंती साळुंके,सविता जगलेकर,सुवर्णा सन्नाके,मश्रुम कुरेशी,सुजाता बंडगर,वैशाली गौड,मुनेराबी शेख,सुरय्या शेख,शांताबाई चलवादी , माया गायकवाड, आदि महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget