राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे
23 मार्च ते 30 मार्च रोजी अर्ज दाखल प्रक्रीया होणार असून छाणनी 31 मार्च रोजी होणार असून 3 एप्रिल रोजी अर्ज काढून घेण्यासाठीचा दिवस आहे.तरी 17 एप्रिल रोजी मतदान तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकिसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून कै.आमदार भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचे नाव आघाडीवर असून या जागेसाठी पाच उमेदवार इच्छूक असून यंदा पंचरगी लढत होणार असल्याचे म्हणले जात आहे.
पोटनिवडणूक जाहीर होताच मतदारसंघात आचारसंहिता ही लागू झाल्याची माहिती तहसीलदार श्री सुशील बेल्हेकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.