covid-19 चे नियम न पाळल्यामुळे पंढरपूर येथील एका स्थानिक पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल!


काल पंढरपूर शहरातील नवीन कराड नाक्या जवळील असलेल्या श्रीयश पॅलेस येथे 252 पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाचे आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत रावजी पाटील पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी समर्थक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे व कोणाच्या नियमाचे पालन न झाल्यामुळे आज सकाळी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे पंढरपूर येथील एका स्थानिक पदाधिकाऱ्यांवर covid-19 च्या सर्व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 144 कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा पंढरपूर येथील पंचायत समितीचे एका कर्मचाऱ्यांकडून दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पंढरपूर शहर पोलीस स्टेशन कडून प्राप्त झाली असून या अनुषंगाने संबंधित व्यक्तींवर वरील कलमानुसार कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget