राजश्री शाहू आघाडीचे उमेदवार जाहीर! (सत्ताधारी गटाच्या पॅनल मध्ये विद्यमान 12 संचालकांचा समावेश.)

 



कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे दूध उत्पादन असलेल्या गोकुळ या दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर आज पर्यंत अनेक तर्क वितर्क लावले गेले होते पण शेवटी सत्ताधारी महाडिक गटाने आज आपले सर्व पत्ते ओपन करून विरोधकांना चांगलाच झटका दिला आहे यामध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पंचवार्षिक गोकुळ च्या निवडणुकीसाठी आपली उमेदवार यादी जाहीर केले असून यामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शोमिका ताई महाडिक यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच बरोबर महिला प्रवर्गातून विद्यमान संचालिका सौ.  अनुराधा ताई पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. या जाहीर पत्रकार परिषदेसाठी माजी मंत्री भरमू पाटील, माजी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक माजी आमदार अमल महाडिक व संजय घाडगे पाटील हे सर्वजण उपस्थित होते.विद्यमान चेअरमन रवींद्र आपटे यांच्यासह तब्बल बारा संचालकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांचे पुत्र चेतन नरके, गडहिंग्लजमधून सदानंद हत्तरकी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शौमिका महाडिक हे नवीन चेहरे दिले आहेत.


सत्तारुढ आघाडीचे नेते आमदार पी.एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी अयोध्या लॉन येथे मंगळवारी दुपारी सत्तारुढ गटाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. सत्तारुढ गटाचे पॅनेल हे सर्वसमावेशक आहे. गोकुळमधील काही संचालक सत्तारुढ गटामधून बाजूला गेले असले तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. ठरावधारक आणि सभासद हे सत्तारुढ गटासोबत आहेत. यामुळे निवडणुकीत सत्तारुढ गटाचा विजय निश्चित असल्याचा दावाही नेत्यांनी केला.

गोकुळमध्ये गेली अनेक वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक हे नेतृत्व करत आहेत. मात्र ते किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आजपर्यंत निवडणूक लढविली नव्हती. यंदा गोकुळच्या निवडणुकीसाठी त्यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. पत्रकार परिषदेला माजी  मंत्री भरमू पाटील, धनंजय महाडिक, अमल महाडिक, संजय घाटगे उपस्थित होते.    



सत्तारुढ पॅनेलमधील सर्वसाधारण गटातील उमेदवार : चेअरमन रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, बाळासाहेब खाडे, उदय निवासराव पाटील, सत्यजित सुरेश पाटील, अंबरिश घाटगे, चेतन नरके, सदानंद हत्तरकी, धनाजीराव देसाई, रविश पाटील-कौलवरक, प्रताप शंकरराव पाटील , प्रकाश चव्हाण, राजाराम भाटले,रणजित बाजीराव पाटील


इतर मागासवर्गीय गट : विद्यमान संचालक पी. डी. धुंदरे.

भटक्या विमुक्त जाती जमाती : विद्यमान संचालक विश्वास जाधव

अनुसूचित जाती जमाती गट : विलास कांबळे.


महिला गट : विद्यमान संचालिका अनुराधा पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget