महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डिस्ने-हॉटस्टार वर इतर प्रादेशिक भाषांमध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यांचे जसे समालोचन केले जाते तसेच मराठी भाषेतही आयपीएल क्रिकेट सामन्यांचे समालोचन करावे अशी मागणी नोव्हेंबर १९२० मध्ये स्टार इंडिया समुहाकडे मनसेने केली होती. याबाबत मनसेने डिस्ने-हॉटस्टार च्या स्टार इंडिया समुहाकडे सतत पाठपुरवठा केल्यानंतर १९२१ मधील १४ व्या आयपीएल क्रिकेट हंगामातील सर्व सामन्यांची कॉमेंट्री म्हणजेच 'समालोचन' मराठी भाषेत असावे हि मागणी पूर्ण झाली आहे. यासंदर्भात स्टार इंडिया समुहाने मनसेला पत्र दिले आहे. तसेच माजी क्रिकेटपटू संदीप पाटील,विनोद कांबळी, अमोल मुजुमदार त्या व्यतिरिक्त कुणाल दाते,स्नेहल प्रधान,चैतन्य संत,प्रसन्न संत हे या सामन्यांची मराठीत कॉमेंट्री (समोलोचन) करणार आहेत.असे मनसेचे केतन नाईक यांनी सांगितले.मराठी भाषिकांनी मराठी कॉमेंट्रीला भरगोस प्रतिसाद दिल्यास येणाऱ्या काळात स्टार इंडियाचे स्वतंत्र स्पोर्ट्स चॅनल येऊ शकते आणि त्यातून अनेक मराठी भाषिक कलाकार, तंत्रज्ञ व इतर यांना संधी मिळू शकेल. डिस्ने-हॉटस्टार आयपीएल क्रिकेटचे सामने पाहताना मराठी भाषेचा पर्याय निवडून सामने पाहिल्यास येणाऱ्या काळात मराठी अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल. मराठी भाषेवर प्रेम करणारा क्रिकेट शौकींनाचा मोठा वर्ग आहे.आयपीएल क्रिकेट सामने पाहताना जरूर मराठी भाषेचा पर्याय निवडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १४ व्या आयपीएल हंगामात क्रिकेट सामन्यांचे आयोजन अहमदाबाद ,बेंगळुरू, दिल्ली, चेन्नई, मुंबई आणि कलकत्ता या शहरात करण्यात आले आहे.अंतीम आयपीएल क्रिकेट सामना ३० मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.