सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील सहाय्यक कामगार आयुक्त श्री .निलेश यलगुंडे व त्यांचे सहकारी अधिकारी संघनमताने बोगस बांधकाम कामगार नोंदणी करुन कोट्यावधी रुपयाचा भष्टाचार करुन शासनाचे आर्थिक नुकसान केले म्हणून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली. त्यावरुन श्री यलगुंडे यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यासाठी कामगार विभागाचे समिती सोलापूरात येऊन चौकशी करुन गेली आहे. अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस व तक्रारदार विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
सोलापुर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत बोगस बांधकाम कामगार नोंदणी प्रकरणात सोलापुरचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री निलेश यलगुंडे व त्यांच्या कार्यालयातील किर्ती देऊळकर आणि इतर अधिकारी संघनमताने मोठ्या प्रमाणात बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करुन कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि महाराष्ट्र शासनाचे कोट्यावधी रुपयाचा नुकसान केले त्यासाठी श्री . यलगुंडे यांना निलंबित करुन बोगस बांधकाम कामगार नोंदणी प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेच्या व्यतिरिक्त सोलापुरातील इतर कामगार संघटना ही अशा प्रकारचे मागणी करुन विविध आंदोलने केली . आणि वेळोवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगारमंत्री , कामगार राज्यमंत्री , पालकमंत्री , जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. याबाबत मा. जिल्हाधिकारी साहेबांनी अनेक वेळा बैठका बोलविले असता एकाही बैठकीत श्री. यलगुंडे व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नाही. यावरुन मा. जिल्हाधिकारी साहेबांनी कामगार आयुक्त व कामगारमंत्री यांच्याकडे बोगस बांधकाम कामगार नोंदणीच्या कामकाजाची अहवाल पाठवून दिले . या सर्व गोष्टींचा सारासार विचार करुन अखेर *महाराष्ट्र राज्य कामगार विभागाकडुन पुण्याचे कामगार उपायुक्त श्री पोळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली २ सहाय्यक कामगार आयुक्त, २ दुकाने निरीक्षक, सरकारी अधिकारी, २ क्लार्क अशा सर्व अधिकाऱ्यांची समिती दि . २४ , २५ , २६ , २७ मार्च २०२१ असे चार दिवस कसुन चौकशी करुन गेल्याचे अधिकृत माहिती मिळते.परंतु या चौकशीच्या वेळी कुठल्याही तक्रार धारकांना निमंत्रित केले नाही . म्हणून चौकशी जरी झाली ती योग्य प्रकारे झाली नाही. अशा प्रकारची तक्रार महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा.कामगार मंत्री, मा. कामगार राज्यमंत्री यांच्याकडे केली आहे . एकुणच यलगुंडे यांची चौकशी समितीकडुन झाल्यामुळे सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व खाजगी दलालांचे दाबे दणाणले पण महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सदर प्रकरणी पुर्ण चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही पत्रकात नमुद करण्यात आली आहे .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.