पंढरपूर शहरातील लाॅकडाऊनला 'स्वाभिमानी'चा विरोध व्यापारी, दुकानदार यांची पदाधिकारी यांनी घेतली भेट




सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर जिल्ह्यात शनिवार व रविवार पूर्ण लाॅकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला होता. दरम्यान सोमवारी रात्री अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश सोलापूर जिल्हाधिकारी यांनी काढण्यात आल्यानंतर मंगळवारी याबाबत व्यापारी तसेच विविध राजकीय पक्ष, संघटना यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंदिर परिसर, नामदेव पायरी या ठिकाणी प्रशासनाच्या निर्णय विरोधात घोषणाबाजी करीत, व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरु ठेवावेत असे सांगितले.                                लाॅकडाऊन मुळे शेतकरी, किरकोळ विक्रेते, व्यापारी यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे.  लाॅकडाऊन करीत असताना या काळातील वीज बिल माफ करावे, होणारे अर्थिक नुकसान शासनाने द्यावे अशी मागणी स्वाभिमानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी मंदिर परिसरातील व्यापारी, दुकानदार यांच्याशी संवाद साधला. यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, धनंजय पाटील, नानासाहेब चव्हाण,सोमनाथ घोगरे, विश्रंती भुसनर, नामदेव कोरके, शिवाजी चव्हाण,दत्ता भोसले, प्रताप गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. लोक डॉन चा निर्णय रद्द करण्यात यावा या बद्दलचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget