मला एक वेळ संधी द्या मी सर्वांचे प्रश्न प्राधान्याने सोडवेन:-समाधान (दादा) आवताडे




(तळपत्या उनात समाधान (दादांचा) प्रचाराचा झंझंजावात)


सोलापूर // प्रतिनिधी

252 पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची निवडणूक जाहीर होऊन दिवसाचा कालावधी झाला असून या मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोहोचला असून या मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची काल तारीख असताना 11 जणांनी काल अर्ज माघारी घेतले असून त्यामध्ये 19 जणांचे अर्ज राहिले आहेत यामध्ये प्रमुख लढत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भारत भालके व महायुती व मित्र पक्षाचे उमेदवार समाधान महादेव अवताडे यांच्यात होत असून सौ.शैलाताई गोडसे यांनी बहुजन विकास आघाडी कडून तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सचिन शिंदे -पाटील यांनी आपल्या अर्ज ठेवले आहेत. यामध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचा दर भौगोलिक विचार करता भूमिपुत्र म्हणून समाधान दादा अवताडे यांना संपूर्ण मतदारसंघातून चांगल्या पद्धतीने पाठिंबा मिळत आहे त्याच प्रमाणे समाधान दादा अवताडे यांनी आपल्या प्रचार यंत्रणेमध्ये कोणतीही कमतरता ठेवली नसून त्यांनी सर्व उमेदवारांच्या अगोदर सर्वच ग्रामीण भागातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे व प्रचारात मोठी आघाडी घेतली असल्याचे चित्र संपूर्ण पंढरपूर व मंगळवेढा मतदारसंघांमध्ये दिसत आहे त्यांनी दोन दिवसात जवळजवळ मंगळवेढा तालुक्यातील 25 गावांचा दौरा करून मंगळवेढा तालुका चांगल्या पद्धतीने पिंजून काढला आहे त्यांनी आपल्या भाषणातून सर्व मतदारांची मने चांगल्या पद्धतीने जिंकली असून त्यांचे भाषणातील सर्व मुद्दे प्रभावी ठरत आहेत. समाधान दादा अवताडे हे संपूर्णपणे विरोधकांचा चांगल्या पद्धतीने खरपूस समाचार घेत आहेत. त्यांच्या बरोबरीने सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार प्रशांतराव परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,आदी सर्व नेतेमंडळी व पदाधिकारी मोठ्या संख्येने दिसत आहेत समाधान दादा अवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील माचनुर पासून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यावेळी त्यांनी बोराळे, सिद्धापूर, तामदडी, आरळी, फटेवाडी,डोनज, भालेवाडी, बालाजी नगर कात्राळ कर्जाळ, कागष्ट,डिकसळ, तळसंगी,मरवडे, रहाटेवाडी मुढवी उचेठाण धर्मगाव आदी सर्व गावांमध्ये दादा पोहोचले असून त्यांनी सर्वांच्या अगोदर गावातील सर्व मतदारांची मने जिंकली आहेत याच बरोबर मुद्देसूद भाषण शैली व जोडीला माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर यांचे वक्तृत्व मिळाल्यामुळे दादांचा विजय हा सुकर होणार असल्याचे मतदारसंघातून बोलले जात आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हा पाण्याचा असून हा पाणी प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित असून यासाठी आजपर्यंत खूप मोठ्या शिवगर्जना झाल्या पण तो पाणी प्रश्न काही सुटला नाही तो पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मला सर्व मतदारांनी एक वेळ विधानसभेत पाठवावे अशी आग्रही मागणी या सर्व सभांमधून समाधान दादा आवताडे यांनी सर्व मतदारांना केली.


याच बरोबर दादांच्या पत्नी सौ अंजलीताई अवताडे यांनी सुद्धा पंढरपूर शहर व ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवून वन टू होम प्रचार करून सर्व मतदारांची मने जिंकली आहेत. त्यांनी सर्व महिलांच्या गाठीभेटी घेत व सर्वांचे प्रश्न समजावून घेत प्रचार चांगल्या पद्धतीने सुरू केला असल्याचे दिसत आहे व बाकी इतर उमेदवारांच्या तुलनेमध्ये सौ अवताडे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे सुद्धा यावेळी स्पष्टपणे जाणवते.

या संपूर्ण प्रचार दौऱ्यामध्ये तुम्हाला काय कळत नाही तुम्ही

भाजप जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख,भाजप जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर,मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,भाजप मंगळवेढा तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल,रयत क्रांती तालुका अध्यक्ष दीपक भोसले, भाजपचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, पंचायत समिती माजी सभापती प्रदीप खांडेकर,दामाजी कारखाना संचालक राजेंद्र सुरवसे,दामाजी कारखाना संचालक लक्ष्मण जगताप,दामाजी कारखाना संचालक सचिन शिवशरण, प्रा.येताळा भगत सर,मा.श्री.दत्तात्रय जमदाडे सर,सूत्रसंचालक दिगंबर यादव आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget