पुणे // प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून कोरोना या रोगाने थैमान घातले असुन राज्यातील सर्व मंत्री मंडळ भरपूर कष्ट घेत असुन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गेल्या काही दिवसात पत्रकार परिषद घेऊन गावातील सर्व सरपंचांना गावपातळीवर सक्षमपणे काम करण्यास सांगीतले आहे. मात्र शासनाने गाव पातळीवर काम करणाऱ्या सरपंचांना कोणत्याही प्रकारचे आरोग्य संरक्षण दिलेले नाही. सरपंच हा गावाचा प्रमुख घटक म्हणुन ओळखले जातात त्यांना लवकरात लवकर आरोग्य संरक्षण द्यावे अन्यथा काही झाल्यास राज्य शासन याला जबाबदार असेल व याची दखल मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री ग्रामविकासमंत्री मंत्री जबाबदार असतील असा इशारा आदर्श ग्राम विकास फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा व शिव सरपंच सेवा संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा आदरणीय सौ जयश्रीताई शुक्ला मॅडम यांनी केले आहे. व प्रत्येक गावाला महाराष्ट्र सरकारने 10लाख रुपये निधी द्यावा अशी मागणी ही त्यांनी केली आहे. व गावात उन्हाळा सुरू असल्याने गावात पाणी टंचाई असताना यात हा कोरोना महामारीचे संकट आले असल्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत म्हणून सर्व सरपंचांना राज्य शासनाने कोरोना योद्धा म्हणून नोंद घ्यावी. अशी मागणीही जयश्रीताई शुक्ला मॅडम यांनी केली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.