सोलापूर // प्रतिनिधी
शेतकऱ्यांचे ऊसबील थकीत ठेवले तरीही सभासद शेतकरी हा या कारखानदाराचे स्वागत हलगी लावून, हारतुरे घालून करतो.ही.प्रवृत्ती शेतकऱ्यांनी सोडली पाहिजे.
समाधान दादा असो वा भगिरथ दादा असो.यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव नाही. शेतकऱ्यांच्या जीवावर हे मोठे होतात. ते बंगल्यात रहातात. महागड्या गाडीतून फिरतात. याकारखानदाराना शेतकऱ्यांचे कष्ट दिसत नाही. शेतकऱ्यांच्या साखरेवर दोनदोन कोटीचे कर्ज काढतात. शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे होणाऱ्या या नेत्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे.
कै.सुधाकरपंतांच्या पाठीमागे पुतणे काय कारभार करतात. हे सर्व पाहून सुधाकरपंत यांना वाईट वाटत असेल. आमदार प्रशांत परिचारक यांनी शेतकऱ्यांच्या साठी किती अंदोलन केले.ते त्यांनी सांगावे.जनतेला जास्त दिवस फसवू शकत नाही.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तसेच मतदारसंघातील रखडलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी एकवेळ सौ.शैलाताई गोडसे यांना संधी द्यावी. आपल्या दोन्ही तालुक्याचा विकास केल्याशिवाय त्या रहाणार नाही. शिट्टी च्या चिन्हा पुढील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.