राज्यात रक्ताची कमतरता भासू लागल्याने राष्ट्रवादी कडून सर्वत्र रक्तदान शिबिराचे आयोजन




सोलापूर // प्रतिनिधी

सध्या राज्यात कोरोनाच्या साथी मुळे रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे रक्ताची कमतरता भासू लागल्याने

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्वत्र रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असा आदेश दिल्याने पवार साहेबांचे आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व युवकचे प्रदेशाध्यक्ष महिबुबभाई शेख यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज पंढरपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिरात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदात्यांनी रक्तदान करून जवळपास ८० रक्तदात्यांनी  आपला हक्क बजावला.  यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते व युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

या रक्तदान शिबिरात ५५ वेळा रक्तदान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिध्दी प्रमुख विजय काळे यांनी सुरवात करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.

याप्रसंगी श्री.विठ्ठल सह.सह.साखर कारखान्याचे चेअरमन व महाविकासआघाडीचे उमेदवार भगीरथ भारत भालके,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील,ए.पी.आय जगदाळे, शहराध्यक्ष सुधीर भोसले,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश राजुबापू पाटील,युवकचे प्रदेश सरचिटणीस अरूण आसबे,राष्ट्रवादी युवतीच्या जिल्हाध्यक्षा श्रिया किरण भोसले, ओबिसी सेलच्या जिल्हाध्यक्षा साधना राऊत,युवकचे शहराध्यक्ष स्वप्निल जगताप,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष गिरिष चाकोते,युवराज भोसले, प्रसिध्दी प्रमुख विजय काळे,कृष्णात माळी,अल्पसंख्यांक सेलचे बाळासाहेब शेख, सचिव सचिन आदमिले, सचिन सोळंकी,मनोज आदलिंगे, निलेश कोरके,सागर पडगळ,राकेश साळुंखे,सुरज गंगेकर,विशाल सावंत,सारंग महामुनी यांचेसह,संगिता माने,सुनंदा उमाटे,प्राजक्ता परचंडराव,किर्ती मोरे, अमृता शेळके यांचेसह महिला पदाधिकारी युवकचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रक्तदान शिबिराचे आयोजन भादुले चौकातील न्यु दोस्ती डिजीटल येथे करण्यात आले होते.

याप्रसंगी सर्व रक्तदात्यांना झाडांची रोपे तसेच सॕनिटायझर व मास्क भेट देण्यात आले.

हे रक्तदान शिबिर यशस्वीपणे राबविण्यासाठी डॉ.खाडिलकर व पंढरपूर ब्लड बँकेच्या स्टाफने सहकार्य केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget